Breaking News

सीबीआयने केली माजी गृहमंत्री देशमुख यांची फाईल बंद: अहवाल फुटला? प्राथमिक चौकशी अहवालातील क्लीन चीट देत असल्याचा कागद बाहेर

मुंबई: विशेष प्रतिनिधी

मुंबईतील बार आणि ऑर्केस्ट्रा चालकांकडून खंडणी गोळा करण्यास सांगण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी करत न्यायालयात धाव घेतली. मात्र याप्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले नसल्याने सीबीआयकडून देशमुख यांची केस लवकरच बंद करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून यासंदर्भातील अहवालातील काही कागदपत्रे सध्या व्हायरल झाली आहेत.

खंडणी गोळा करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केल्यानंतर यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानेही याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा न नोंदविता सीबीआयने केलेल्या चौकशीच अनिल देशमुख यांच्या विरोधातील तोंडी, लेखी, ऑडिओ-व्हिडिओ यासह अनेक गोष्टींची तपासणी केली. मात्र परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने एकही पुरावा सीबीआयला आढळून आलेला नसल्याचे सीबीआयने आपल्या अहवाल नमूद केल्याचे दिसून येत आहे.

हुक्का पार्लर, बार आणि ऑर्केस्ट्राकडून पैसे गोळा करण्याचे कामात सचिन वाझे हे सहभागी होते की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.  परमबीर सिंग यांना एसएमएसद्वारे माहिती देणारे पोलिस अधिकारी संजय पाटील यांनी असे काही घडल्याप्रकरणी नकार कळविल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र सचिन वाझे हे स्वत:साठी पैसे गोळा करत की अन्य कोणाच्या सांगण्यावरून पैशाची वसुली करत होते याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झाली नसल्याचे सीबीआयने आपल्या अहवाल नमूद करण्यात आले. त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्याकडून कोणताही गुन्हा दाखल करण्या येण्याबाबत कोणतेही कृत्य घडले नसल्याचे सांगत सदरची केसची चौकशी बंद करण्यात आल्याची सीबीआयने नमूद केले.

सीबीआयच्या अहवालातून आता अनिल देशमुख यांच्या विरोधातील चौकशी बंद करण्यात आल्याचे नमूद करण्यात आल्याने देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच याप्रकरणातून सचिन वाझे हे ही बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान सीबीआयनेच आता माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे आरोप खोटे ठरविल्याने परमबीर सिंग यांच्या मात्र अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

सीबीआयच्या प्राथमिक चौकशी अहवालातील हाच तो व्हायरल झालेला कागद

Check Also

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्म यांनी शपथ घेतल्यानंतर म्हणाल्या… सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनी दिली शपथ

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत ६४ टक्के मते मिळवित विजयी झालेल्या द्रौपदी मुर्मु यांना आज देशाच्या १५ …

Leave a Reply

Your email address will not be published.