Breaking News

राणे म्हणाले, यात्रेच्या दरम्यान मांजर आडवं गेलं : अजित पवार अज्ञानी जन आर्शिवाद यात्रेच्या शेवटच्या दिवशीही राणेंचे शिवसेनेवर टीकास्त्र

कणकवली: प्रतिनिधी

यात्रेला चांगली सुरुवात झाली होती. मात्र मध्येच मांजर आडवं गेल्याची उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर करत आगामी निवडणूकीत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडूण येणार नसल्याचे आव्हानही त्यांनी दिले.

जन आर्शिव्राद यात्रेचा आजचा शेवटचा दिवस असून आजे ते कणकवली येथे आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मला काहीजण जाणीवपूर्वक बोलायला बाध्य करत आहेत. मात्र मी बोलायला लागलो तर सगळंच सांगेन असा इशारा राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देत माझ्यावर वैयक्तिक पातळीवर टीका कराल तर मी माझ्या दैनिकातून कोण कुठे बसतं, कोणासोबत बसतं यासह सगळं सांगायला सुरुवात करेन. त्यामुळे मला भाग पाडू नका असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.

माझी दोन्ही मुलं हुशार आहेत मला त्रास होईल असे कधीच वागत नाहीत. ते दोघेंही समजूतदार असून योग्य पध्दतीने काम करत असल्याचे प्रशस्ती पत्रकही त्यांनी आपल्या पुत्रांना देवून टाकत ते पुढे म्हणाले, दुसऱ्याच्या मुलांवर लिहिण्यापेक्षा स्वत:ची मुले काय करतात ते बघा, मालकाच्या मुलंकडेही बघा असा उपरोधिक टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

पूर्वी कोणी आवाज केला तर त्याच्या विरोधात आवाज काढला जायचा. परंतु आता पूर्वीची शिवसेना राहिली नसून आताची शिवसेना फक्त नातेवाईकांसाठी काळजी करत आहे. त्यादिवशी माझ्या घरावर जे शिवसैनिक चालून आले. त्यातून नातेवाईक असलेल्या वरूण सरदेसाईचे नाव पोलिस तक्रारीतून काढण्यात आले. बाकीच्या शिवसैनिकांवर गुन्हे तसेच ठेवल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

जेव्हा अतिरेक्यांकडून बाळासाहेबांना धोका होता. त्यावेळी ते काही दिवस अज्ञातस्थळी होते. तेव्हा त्यांनी मला एवढंच सांगितले होते की, माझी गाडी घराच्या बाहेर पडली की तुझ्या सगळ्या गाड्या माझ्या मागे आल्या पाहिजेत. त्यानुसार त्यांच्या सोबत गाड्यांचा ताफा ठेवला आणि पुढे काही दिवस अज्ञातस्थळी राहिले. साहेबांच्या सुरक्षेसाठी आणि शिवसेनेनेसाठी अनेक गोष्टी करूनही माझ्याबरोबर ते तसे वागले. म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी आताची शिवसेना काहीच काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी अजित पवार यांनी केलेल्या टीकेच्या अनुषंगाने विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार हे अजून अज्ञानी आहेत. त्यांना बरचं काही अजून समजायचं आहे. मात्र आपल्यावरील केसेसे कशा काढून घ्यायच्या हे अजित पवार यांच्याकडून शिकावं असा टोलाही त्यांनी यावेळी अजित पवारांना लगावला.

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आडनाव गृहित धरणे चुकीचे आयोगापर्यंत अचुक माहिती पोहचवण्यासाठी संबंधितांना सुचना द्या

नुकतेच ओबीसीच्या इम्पिरियल डेटा गोळा करण्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे कान टोचल्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published.