Breaking News

अतिवृष्टीचा फटका ८९० गावांना: जाणून घ्या कोठे किती मृत्यू आणि स्थलांतरीतांची संख्या अद्यापही ५९ अद्यापही बेपत्ता ७६ मृत्यू; सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई : प्रतिनिधी

सततच्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी- रायगडसह ९ जिल्ह्यात झालेल्या पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये एकूण ७६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही ५९ नागरीक बेपत्ता आहेत. यापैकी सर्वाधिक नागरीत रायगड जिल्ह्यातील आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून ९ जिल्ह्यातील जवळपास ९० हजार नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास ८९० गावांना या अतिवृष्टीचा फटला असून सर्वाधिक नुकसान रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात झाले आहे.

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, मुंबई उपनगर, सिंधुदूर्ग, ठाणे या जिल्ह्यांना फटका बसला आहे. कोल्हापूरातील पुरात ५ जणांचा मृत्यू, सातारा येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा समावेश, रत्नागिरीतील दुर्घटनेत ११ जणांचा तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात झालेल्या दरड दुर्घटनेत ४७ जणांचा मृत्यू पावले आहेत. तर जवळपास ५३ जण बेपत्ता आणि २८ जण जखमी झाले आहेत.

सातारा जिल्ह्यात ३७९ गावे बाधित, १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर, १८ जणांचा मृत्यू, २४ जण बेपत्ता तर ३ हजार २४ पशुधनाचा मृत्यू

गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित झाली असून १८ जणांचा मृत्यू, २४ जण बेपत्ता, ३ हजार २४पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जणांना स्थलांतरीत करण्यात आलेले असून एनडीआरएफ एक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

जिल्ह्यातील एकूण १६७ गावे पुर्णत: व २१२ गावे अंशत: अशी एकूण ३७९ गावे बाधित झाली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील ४४ गावे पुर्णत: व ७ गावे अंशत: अशी एकूण ५१ गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण ३० गावे अंशत: बाधित झालेली आहेत. पाटण तालुक्यातील १० गावे पुर्णत: व ६० गावे अंशत: अशी एकूण ७० गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील ११३ गावे पुर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील १३ गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील १०२ गावे अंशत: बाधित झाली आहेत.

बाधित जिल्हे :                                                    एकूण ९

कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे

एकूण बाधित गावे :                                            ८९०

एकूण मृत्यू :                                                      ७६

हरविलेल्या व्यक्ती :                                           ५९

जखमी व्यक्ती :                                                  ३८

पूर्ण नुकसान झालेली घरे:                                    १६

अंशतः: नुकसान झालेली घरे:                              ६

प्राण्यांचे मृत्यू :                                                   ७५

सुरक्षित स्थळी हलविलेल्या व्यक्ती:                      ९० हजार

मदत छावण्या :                                                  ४

निवारा केंद्रे  :                                                     रत्नागिरी ६ ( २ हजार लोक)

सुविधांचे नुकसान :                                           चिपळूण येथे वशिष्टी नदीवरील पूल खचला


लष्करएनडीआरएफ सहाय्य

  • एनडीआरएफच्या एकूण २५तुकड्या ;

(मुंबई २, पालघर १, ठाणे २, रायगड १, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग २, सांगली २, सातारा ३. कोल्हापूर ४, पुणे २ )

  • भुवनेश्वरहून मागविल्या ८ तुकड्या-

या कोल्हापूर २, सातारा १, सांगली २ इथे तैनात केल्या जातील, तसेच २ तुकड्या पुणे येथे राखीव असतील.

  • तटरक्षक दलाच्या ३, नौदलाच्या ७, लष्कराच्या३ तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे
  • एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी२ अशा ४  तुकड्या
  • बोटी : ५९ ( ४८ एनडीआरएफ आणि ११एसडीआरएफ)

महाड येथील परिस्थिती :

अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी वाढून महाड आणि पोलादपूर येथे पूर आला. सावित्री नदीवरील पूल मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्याने बचाव पथकांना वेळीच पोहोचणे अवघड झाले. एनडीआरएफच्या जवानांना हवाईमार्गे दुर्घटनास्थळी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सुरुवातीला अतिशय खराब हवामानामुळे ते उतरू शकले नाहीत, मात्र नंतर त्यांनी बचाव कार्य सुरु केले आणि माणगाव येथे बचाव केंद्रे सुरु करण्यात आली.

३ ठिकाणी दरडी कोसळल्या

तळीये मधलीवाडी (ता. महाड)

साखरसुतारवाडी

केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर)

२ कोटी रुपये निधी  

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपये देण्यात आले असून पाउस आणि पाणी ओसरल्याने मदत कार्यास वेग देण्यात आला आहे.

१००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

जिल्हानिहाय जिवीतहानी आणि प्राण्यांचे नुकसान- तक्ता पहा

जिल्हा मृत्यूमुखी जखमी बेपत्ता
व्यक्ती जनावरे
रायगड 47 33 28 53
रत्नागिरी 11
कोल्हापूर 5 3
सातारा 6 25 4
सांगली 8
सिंधुदूर्ग 2 3
मुंबई 4 7
पुणे 1 6
ठाणे 2
एकूण 76 75 38 59

जिल्हानिहाय स्थलांतरीत करण्यात आलेली माहिती- तक्ता पहा

जिल्हा स्थलांतरीत करण्यात आलेल्यांची संख्या
रत्नागिरी 1200
सातारा 734
ठाणे 2681
कोल्हापूर 40882
सांगली 42573
पुणे 263
रायगड 1000
एकूण 89333

Check Also

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून वांद्रे-वरळी सी-लिंक प्रमाणे मुळ गावाजवळ नवा हायटेक ब्रीज कुंभरोषी कलमगांव तापोळा ते अहिर गाव रोड, टी अॅण्ड टी कंपनी कंत्राटदार

मागील साडेसात वर्षापासून नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम ही दोन खाती सांभाळणारे आणि आता मुख्यमंत्री पदी …

Leave a Reply

Your email address will not be published.