Breaking News

सर्वसामान्यांना महागाईचा चटका, आजपासून घरगुती गॅसच्या दरात ५० रूपयांची वाढ वर्षभरात २१८ रूपयांनी महाग

मागील काही दिवसांमध्ये भारतीय तेल कंपन्यांनी गॅसच्या दरात कपात केल्यानंतर आज पुन्हा एकदा वाढत करत तब्बल गॅसच्या दरात ५० रूपयांची वाढ केली. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना दरवाढीचा चटका बसणार आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिली.

गेल्या एका वर्षात घरगुती सिलेंडरचा दर ८३४.५० रुपयांवरून आता १०५३ रुपयांवर पोहोचला आहे. १४.२ किलो घरगुती सिलेंडरच्या दरात १९ मे २०२२ रोजी ४ रुपयांची शेवटची कपात करण्यात आली होती. यापूर्वी ७ मे रोजी दिल्लीत ९९९.५० रुपये प्रति सिलेंडर दर होता. ७ मे रोजी एलपीजी सिलेंडर २२ मार्च २०२२ रोजी ९४९.५० रुपयांच्या तुलनेत ५० रुपयांनी महागला. २२ मार्चलाही सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. यापूर्वी, ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत, दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर ८९९.५० रुपये होते.

१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमधील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहचली आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे. तर व्यवसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आली.

एक जुलै रोजी दिल्लीमध्ये १९ किलोच्या म्हणजेच व्यवसायिक वापरातील सिलेंडरच्या किंमती १९८ रुपयांनी कमी करण्यात आलेल्या. तर एक जून रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत १३५ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.

एक एप्रिल रोजी १९ किलो व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत २५० रुपयांनी वाढवण्यात आली होती. त्यावेळी सिलेंडरची किंमत २ हजार २५३ पर्यंत गेलेली. तर एक मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १०५ रुपयांनी वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा नव्याने किंमती वाढवण्यात आल्याने याचा फटका सर्वसमान्यांना बसणार आहे.

दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत २०२१ रुपये होती. आज त्यात ८ रुपये ५० पैशांनी वाढ झाली असून ही किंमत आता २०३० रुपयांपर्यंत पोहचली आहे. तर कोलकात्यामध्ये सिलेंडरच्या दर आता २१४९ वर पोहचले आहेत. मुंबईत १९९० रुपयांवर, तर चेन्नईमध्ये २१९५ रुपयांपर्यंत एलपीजी गॅसची किंमत कमी झाली आहे. जूनमध्ये व्यावसायिक सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मे महिन्यात घरगुती सिलेंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. पहिल्यांदा ७ मे आणि १९ मे रोजी ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर आता १ हजार ५२ रुपये ५० पैशांना उपलब्ध होईल. तर कोलकात्यामध्ये हाच दर १ हजार ७९ रुपयांपर्यंत गेलाय. चेन्नईमध्ये गॅस सिलेंडर १ हजार ६८ रुपये ५० पैसे इतका असल्याचं इंडियन ऑइल कॉर्परेशनने स्पष्ट केले.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *