Breaking News

उध्दव ठाकरे – एकनाथ शिंदे वाद आता पाच सदस्यीय घटनापीठासमोर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

अखेर पाचवेळा तारखा पुढे ढकलल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने उध्दव ठाकरे विरूध्द एकनाथ शिंदे प्रकरणाची याचिका पाच सदस्यीय खंडपीठाकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेत परवा यावर घटनापीठासमोर सुनावणी घेण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एन.व्ही.रमणा यांनी देत शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत पुढील सुनावणी घेवू नये असे आदेशही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर शिवसेना आमचीच असल्याचा दावाही एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला. यासह विविध प्रश्नांवर एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे गटाकडून एकमेकांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवरील ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी झाल्यानंतर जवळपास चार ते पाच वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली. अखेर आज ही सुनावणी घेण्यात आली.

त्यावेळी सर न्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या याचिका या पाच सदस्यीय कडे पाठविण्यात येत आहेत. या याचिकांमधील घटनात्मक बाबींवर घटनापीठाकडूनच निर्णय घेण्यात येणार असून ही याचिका उद्याचा दिवस सोडून परवा लिस्ट करावी असे आदेशही त्यांनी न्यायालयाच्या प्रशासनाला दिले.

यावेळी उध्दव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले, निवडणूक आयोगासमोर जाण्यासाठी आम्हाला किमान एक आठवड्याचा कालावधी हवा आहे. तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेवू नये अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली.

त्यावर सरन्यायाधीश रमणा यांनी घटनापीठाकडून सुनावणी होईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेवू नये असेही स्पष्ट आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. त्यावर शिंदे गटाच्या वकील कौल यांनी निवडणूक आयोगाने आधीच त्या विषयीची याचिका लिस्ट केलेली असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर रमणा म्हणाले, दोन दिवसात असे काही आकाश कोसळणार नाही असे सुनावत घटनापीठाकडून सुनावणी होत नाही तो पर्यंत निवडणूक आयोग कोणताही निर्णय घेवू नये असे स्पष्ट बजावले.

तसेच शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाच घेईल पण घटनापीठाकडून पुढील सुनावणी होत नाही तोपर्यंत निर्णय घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

या याचिकांवर घटनापीठ घेणार सुनावणी…

एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा उपाध्यक्षांना असलेले अधिकार आणि अपात्रतेच्या निर्णयाचे अधिकार

राज्यपाल यांनी बहुमत चाचणी सिध्द करण्याविषयी काढलेल्या आदेशाविरोधात उध्दव ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेली याचिका

नव्या विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्त्याला दिलेल्या मान्यतेच्या विरोधात याचिका

१४ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *