Breaking News

शरद पवार यांनी इंदुरीकर महाराजांना दिला जाहिर कार्यक्रमात इशारा, पण प्रेक्षकांमध्ये हशा मी त्यांचा लाभ पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही

वारकरी संप्रदायात इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे मोठ्या प्रमाणावर फॅन आहेत. तसेच त्यांच्या किर्तन सादर करण्याच्या पध्दतीमुळे आणि वास्तवतेतील उदाहरणे देत राज्यातील लोकांमध्ये मनोरंजन आणि अध्यात्मिकतेचे बाळकडू पाजत असतात. कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात त्यांनी इंदुरीकर महाराजांवर केलेल्या विधानावर मोठा हशा पिकला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, एक जण माणसात सहजपणानं चांगले संस्कार कसे करता येईल, हे चांगलं काम निवृत्ती महाराज करतात. त्याचबरोबर, आज मला त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली नाही. पण, मी त्याचा लाभ पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही, मी एवढाच इशारा त्यांना देऊ इच्छितो, असे शरद पवार यांनी म्हणताच कार्यक्रमात उपस्थित लोक पोट धरून हसू लागले.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, काँग्रेस पक्षाचे नेते रविंद्र धंगेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली होती.

शरद पवार म्हणाले की, उद्या दिल्लीत सकाळच्या सुमारास संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. तसेच सकाळच्या वेळेत अधिक विमान ये-जा करित असतात. त्यामुळे या कार्यक्रमामधून जावं लागत आहे. तसेच, मला निवृत्ती महाराज यांचं कीर्तन ऐकण्याची इच्छा होती. त्यांच्या किर्तनामध्ये गंमती असतात. अनेकदा किर्तन टीव्हीवर पाहत असतो. त्यांची अ‍ॅक्शन काय, त्यांची दिशा काय, मी त्यांच्या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगत नाही. मात्र, एक जण माणसात सहजपणानं चांगले संस्कार कसे करता येईल, हे चांगलं काम निवृत्ती महाराज करतात. त्याचबरोबर, आज मला त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली नाही. पण मी त्याचा लाभ पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही. मी एवढाच इशारा त्यांना देऊ इच्छितो, असे त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Check Also

धीरेंद्र महाराज विरोधात गुन्ह्यास पोलिसांचा नकारः श्याम मानव म्हणाले, आता न्यायालयच सांगेल पोलिस म्हणतात आम्ही सहा तासाचे फुटेज तपासले त्यावरून कायद्याचा भंग होत नाही

नागपूरात आपल्या दिव्यशक्तीच्या आधारे एका पत्रकाराच्या चुलत्याचे आणि त्याच्या कुटुंबियांची माहिती जाहिररीत्या सांगणाऱ्या बागेश्वर मठाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *