Breaking News

भाग ३: मेट्रो-६ घोटाळ्याप्रकरणी फडणवीसांनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश एमएमआरडीए आयुक्तांना पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे दिले निर्देश

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न होवून सात महिने झाले. या सात महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएच्या मेट्रो-६ प्रकल्पातील बोगस प्रकल्पबाधितांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला. मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा घोटाळ्याकडे पहायला लागला वेळ नसल्याने अखेर मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या संस्थेतील घोटाळ्यातील सहभागींवर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीए आयुक्त ई.व्ही.श्रीनिवासन यांना दिले.

उलथवून टाकत तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थानापन्न केले. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी हे सर्वसामान्यांचे सरकार आणि जनतेच्या मनातील सरकार असल्याचे जाहिर केले. ज्या सर्वसामान्यांच्या नावावर मुख्यमंत्री पदसिध्द अध्यक्ष असलेल्या घोटाळ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने सदर घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन यांना याप्रकरणाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मेट्रो-६ बोगस प्रकल्पबाधित घोटाळ्याशी संबधित या ही बातम्या वाचा

भाग-१: मुख्यमंत्री शिंदेच्या अध्यक्षतेखालील सरकारी संस्थेचा सर्वसामान्यांच्या नावावर सदनिका घोटाळा

भाग २: मेट्रो-६ प्रकल्प PAP घोटाळा पचविण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न

मेट्रो प्रकल्प-६ च्या १३५ बोगस प्रकल्पबाधितांना पात्र ठरवित सदनिका वितरण करत ५०० कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सर्वे अधिकारी उपजिल्हाधिकारी रचना इंदूलकर, उपजिल्हाधिकारी (जमीन अधिग्रहण) गणेश सांगळे यांच्यासह संबधित सहा दलालांचा सहभाग असलेला घोटाळा ११ जानेवारी २०२३ रोजी उघडकीस आला. तसेच हा बोगस सदनिका धारकांचा ५०० कोटी रूपयांचा सदनिका वितरणाचा घोटाळा पचविण्याचा प्रयत्न संबधित अधिकाऱ्यांनी केला.
त्यानंतर २१ जानेवारी २०१३ रोजी यासंदर्भात भाजपाच्या एका आमदाराने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रितसर पत्र लिहीत तक्रार केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन यांना स्पष्ट निर्देश देत हा गंभीर घटना असून याची तातडीने चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच या घोटाळ्याची चौकशी करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी आणि पोलिसांकडे गुन्हे नोंदवावेत असे आदेश दिले.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या घोटाळ्याची कागदपत्रे पोहोचल्याची माहिती एमएमआरडीएच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली असून त्यावर तातडीने सर्व घडामोडी सुरु झाल्याचे सांगितले.
या घोटाळ्यातील सहभागी अधिकाऱ्यांबरोबरच काही दलालांची माहिती काढण्याचे काम सुरु झाले आहे.

विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात दस्तुर खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कुटुंबियांच्या विरोधात आणि त्यांच्या जवळच्या गोटात असलेले संजय राऊत, अनिल परब, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजपा नेत्यांनी आरोपाची राळ उठवित चौकशी लावली. मात्र आता भाजपा सोबत असलेले एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेत बोगस प्रकल्प बाधितांचा घोटाळ्याची कागदपत्रे हाती येवूनही एकाही भाजपा नेत्याने अद्याप त्याबाबत उघड भाष्य केले नसल्याने आगामी काळात उध्दव ठाकरे यांच्यासोबत केलेल्या घटनेची पुर्नरावृत्ती शिंदे गटासोबत होणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *