Breaking News

दिव्यांग, नेत्रहीन मुलांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना आर्ट इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून केले अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुंबई भारतीय जनता पार्टीच्या गुजराती सेलतर्फे आर्ट इन्स्टॉलेशन कार्यक्रम पार पडला. गुरुवार १९ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, नरीमन पॉईंट, मुंबई येथे आर्ट इन्स्टॉलेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

कागदी झेंडे, सूत, लाकूड, लोकर अशा पर्यावरणपूरक साधनांमधून हे आर्ट इन्स्टॉलेशन साकारण्यात आले होते. या आर्ट इन्स्टॉलेशनचा आकार 12 x 8 फूट असा असून दिव्यांग, नेत्रहीन मुलांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना ही अनोखी मानवंदना देण्यात आली. आर्ट इन्स्टॉलेशनची संकल्पना जयंत पटेल, कला दिग्दर्शक सुमित पाटील तर योगिता तांबे, शबनम अन्सारी, आंकाक्षा वाकडे. श्रीदेवी या कलाकारांनी  ही कलाकृती साकारली.

आर्ट इंन्स्टॉलेशनचे उद्घाटन मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केले. यावेळी मुंबई भाजपा गुजराती सेलचे अध्यक्ष संजीव पटेल व गुजराती सेलचे जिल्हाअध्यक्ष श्रेणिक शहा, संतोष चोकीदार, हितेश शहा, भावेश भानुशाली, नयन शहा व मुकेश कडाकिया, किरीटभाई भन्साळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *