Breaking News
photo is symbolic

कोरोना : निर्बंध जाहिर केलेल्या जिल्ह्यांमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ ६ हजार ११२ नवे बाधित, २ हजार १५९ बरे झाले तर ४४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने मुंबईसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात टप्प्यानुसार संचार बंदी लागू करत काही प्रमाणात निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. निर्बंध घातलेल्या पहिल्याच दिवशी नाशिक मंडळ, औरंगाबाद, पुणे, नागपूर, लातूर आदी मंडळात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

एकट्या मुंबई शहरात ८०० हून अधिक रूग्ण आढळून आले तर महानगर प्रदेशातील भागातील मिळून १४५३ रूग्ण आढळून आले. नाशिक मंडळातील नाशिकसह ५ जिल्ह्यात ६८९. पुणे मंडळातील ४ जिल्ह्यात ११६५, औरंगाबाद मंडळातील ४ जिल्ह्यात २४३, अकोला मंडळातील ५ जिल्ह्यात १४००, नागपूर मंडळातील ६ जिल्ह्यात ९२१ इतके रूग्ण आढळून आली आहे. तुलनेत या मंडळाच्या तुलनेत कोल्हापूर मंडळातील ४ जिल्ह्यात ७१ तर लातूर मंडळातील सर्व जिल्ह्यात मिळून १७० रूग्ण आढळून आले आहेत. याप्रमाणे राज्यात एकूण ६ हजार ११२ एकूण बाधित मागील २४ तासात आढळल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४४ हजार ७६५ वर पोहोचली आहे.

तर मागील २४ तासात २,१५९ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ८९ हजार ९६३ घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.३२% एवढे झाले आहे. राज्यात आज ४४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५५,८८,३२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,८७,६३२ (१३.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,०८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,५८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८२३ ३१७३१० ११४३७
ठाणे ५३ ४२१२७ ९९५
ठाणे मनपा १३८ ६१२७४ १२५३
नवी मुंबई मनपा १२६ ५८६७४ १११९
कल्याण डोंबवली मनपा १४६ ६५७०६ १०५०
उल्हासनगर मनपा ११ ११७८४ ३५०
भिवंडी निजामपूर मनपा ६९०५ ३४१
मीरा भाईंदर मनपा २१ २८२९२ ६६६
पालघर १७१०२ ३२१
१० वसईविरार मनपा २२ ३१४२६ ६१८
११ रायगड ४२ ३८००१ ९९१
१२ पनवेल मनपा ६० ३१८२४ ६०२
ठाणे मंडळ एकूण १४५३ ७१०४२५ १९७४३
१३ नाशिक ७५ ३८०४६ ७९८
१४ नाशिक मनपा १७६ ८१८३७ १०६७
१५ मालेगाव मनपा २९ ४८७१ १६४
१६ अहमदनगर ८८ ४७३६३ ७१५
१७ अहमदनगर मनपा ४० २६३३३ ४०४
१८ धुळे १४ ८८५८ १८७
१९ धुळे मनपा २९ ७५९६ १५०
२० जळगाव ११० ४५१६० ११६५
२१ जळगाव मनपा ७२ १३४३५ ३२९
२२ नंदूरबार ५६ १००९० २१५
नाशिक मंडळ एकूण ६८९ २८३५८९ ५१९४
२३ पुणे २११ ९५६४८ २१४१
२४ पुणे मनपा ५३५ २०३३५२ ४५५८
२५ पिंपरी चिंचवड मनपा २५९ ९९४०७ १३२१
२६ सोलापूर ४२ ४३७३२ १२१३
२७ सोलापूर मनपा ४९ १३३८७ ६२०
२८ सातारा ६९ ५७७९५ १८३६
पुणे मंडळ एकूण ११६५ ५१३३२१ ११६८९
२९ कोल्हापूर ३४७३० १२५७
३० कोल्हापूर मनपा १४६९९ ४१७
३१ सांगली ३३०८० ११६१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८०५२ ६२९
३३ सिंधुदुर्ग ६५६० १७७
३४ रत्नागिरी ४४ ११८८५ ४११
कोल्हापूर मंडळ एकूण ७१ ११९००६ ४०५२
३५ औरंगाबाद १९ १५७५९ ३२९
३६ औरंगाबाद मनपा १२४ ३४८१७ ९२६
३७ जालना ४८ १३९२१ ३७०
३८ हिंगोली १४ ४५२२ १००
३९ परभणी ११ ४५६४ १६५
४० परभणी मनपा २७ ३६२४ १३२
औरंगाबाद मंडळ एकूण २४३ ७७२०७ २०२२
४१ लातूर ३४ २१७८५ ४६८
४२ लातूर मनपा १८ ३३१६ २२७
४३ उस्मानाबाद २९ १७८०६ ५५९
४४ बीड ३४ १८६५७ ५५८
४५ नांदेड १० ९०६३ ३८४
४६ नांदेड मनपा ४५ १३६५८ २९५
लातूर मंडळ एकूण १७० ८४२८५ २४९१
४७ अकोला ५६ ४९८६ १३६
४८ अकोला मनपा १२७ ८३४१ २३७
४९ अमरावती १३२ ९६०१ १८६
५० अमरावती मनपा ६२३ १९०२८ २३९
५१ यवतमाळ २५८ १६९४० ४६६
५२ बुलढाणा १०५ १६२५७ २५४
५३ वाशिम ९९ ७७५१ १६१
अकोला मंडळ एकूण १४०० ८२९०४ १६७९
५४ नागपूर १२२ १६७९९ ७७५
५५ नागपूर मनपा ६३० १२६५३८ २६८४
५६ वर्धा १०६ ११८३२ ३०४
५७ भंडारा १८ १३७४४ ३१३
५८ गोंदिया १४४६९ १७३
५९ चंद्रपूर १४ १५१७८ २४६
६० चंद्रपूर मनपा १४ ९२६१ १६४
६१ गडचिरोली ११ ८९२८ ९९
नागपूर एकूण ९२१ २१६७४९ १२ ४७५८
इतर राज्ये /देश १४६ ८५
एकूण ६११२ २०८७६३२ ४४ ५१७१३

आज नोंद झालेल्या एकूण ४४ मृत्यूंपैकी १९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू नागपूर -६, औरंगाबाद -२, ठाणे -२, अकोला -१, लातूर -१, उस्मानाबाद -१, नाशिक -१ आणि वर्धा -१ असे आहेत.

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *