Breaking News

Tag Archives: mangal prabhat lodha

मंगलप्रभात लोढा यांची माहिती, दरवर्षी ५००० आयटीआयच्या प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आयटीआयचा उपक्रम; प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे पुण्यात झाले उद्घाटन

राज्य सरकारचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण विभागांतर्गत व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने १७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे आयोजित ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम’ अर्थात ‘ट्रेन द टीचर्स’ कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता …

Read More »

राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२५: महाराष्ट्रात स्टार्टअप्स सक्षमीकरणासाठी कार्यक्रमाचे आयोजन जास्तीत जास्त स्टार्टअप्सना सहभागी होण्याचे कॅबिनेट मंत्री लोढा यांनी केले आवाहन

स्टार्टअप्स हे केवळ स्थानिक आणि जागतिक पातळीवरची आव्हानेच सोडवत नाहीत, तर यातून रोजगार निर्मिती, राज्याच्या अर्थव्यवस्थेला वृद्धिंगत करण्यासाठी हातभार लावते. २०४७ सालापर्यंत भारताला जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्था बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेसह, भारताचे दूरदृष्टी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. या विशेष दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, …

Read More »

महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन मंगलप्रभात लोढा आणि अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत आज कांदिवली पूर्व येथे महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन करण्यात आले. कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर येथे स्नानगृह उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन …

Read More »

शिवसेना उबाठाच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मंदिर हटविण्याचे आदेश मागे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश: दादर हनुमान मंदिर सुरक्षित

दादर पूर्व रेल्वे स्टेशन लगत साधारणतः ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर रेल्वेच्या जागेवर असल्याने त्याला हटविण्याचे आदेश रेल्वे विभागाकडून जारी करण्यात आले. त्या आदेशावरून नुकतेच शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या मंदिर हटविण्याला विरोध दर्शवित हेच का भाजपाचं हिंदूत्व असा सवाल केला. तसेच आज या मंदिरात …

Read More »

आयटीआय मुंबईचे नामकरण, संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनींचा शुभारंभ कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद-राज्यमंत्री जयंत चौधरी

महाराष्ट्र शासनाने युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केले असून हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे, ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हे कौतुकास्पद असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास …

Read More »

मंगल प्रभात लोढा यांची घोषणा, रामलीला आयोजनातील अडथळे झाले दूर नवरात्रोत्सवानिमित्त मंगलप्रभात लोढा यांची माहिती

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने आज मुंबईमधील सर्व रामलीला मंडळांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आज सर्व रामलीला मंडळांच्या प्रश्नासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या ज्यामुळे रामलीला उत्सवाचे आयोजन आता अधिक सोपे होणार आहे. …

Read More »

मंगलप्रभात लोढा यांचा इशारा, धारावीमध्ये कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई सीसीटीव्ही फुटेज बघुन कारवाई करणार

आज मुंबई महापालिकेद्वारे सायन धारावी परिसरातील एका प्रार्थनास्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी महापालिकेच्या जी नॉर्थ प्रभागाचे अधिकारी या रस्त्यावर पोहोचले. यावेळी काही कट्टरपंथीयांनी प्रशासनाच्या कामात अडथळा आणण्यास सुरुवात केली. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या बसेसचे नुकसान देखील झाले. सदर तणावपूर्ण …

Read More »

मंगल प्रभात लोढा यांची माहिती, युवतींसाठी ‘हर घर दुर्गा अभियान’ आयटीआय संस्थेतील विद्यार्थींनीसाठी घेतला जाणार आत्मसंरक्षणाचा वर्ग

आता हर घर दुर्गा अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणसासाठी सुद्धा राखीव तासिका असाव्यात यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच हर घर दुर्गा अभियान सरकारच्या मालकीच्या आयटीआय संस्थेतील विद्यार्थींसाठी राबविण्यात येणार …

Read More »

मंगल प्रभात लोढा यांची माहिती, आयआयटी, महाविद्यालयांमध्ये महिलांना स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण सर्व आयटीआयसह मुंबई उपनगरमधील

महिला व बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुंबई उपनगरातील विविध शाळा महाविद्यालय आणि शासकीय वसतिगृह येथे महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संस्थानी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मुंबई उपनगरमधील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सप्टेंबर पासून स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. …

Read More »

मानखुर्द येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पहिले अहिल्याभवन उभारणार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले ‘अहिल्याभवन’ मानखुर्द येथे उभारले जाणार असल्याची घोषणा आज केली. जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या अहिल्याभवनासाठी ४७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच ३५,५०० स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले …

Read More »