Breaking News

Tag Archives: mangal prabhat lodha

कोरोना कालावधितील विधवा आणि अनाथ मुलांच्या मानधनात वाढ मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

राज्यात कोरोना कालावधित विधवा झालेल्या महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांसाठीच्या बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानामध्ये २ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असून येत्या तीन महिन्यांत सदरहू रक्कम वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. राज्यात मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत …

Read More »

काँग्रेस म्हणते, समन्वय समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहाला विरोध करणे हा सरकारचा हेतू शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रती काळा कायदा आणू इच्छिते...

महिला संरक्षणाच्या नावाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याच्या हेतूने महिला व बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांची आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रति काळा कायदा आणू इच्छिते, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो व या कायद्याला समस्त महिलावर्गाने विरोध करावा असा आग्रह …

Read More »

जी – 20 परिषदेच्या माध्यमातून पर्यटनस्थळांची माहिती जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

जी-20 परिषदेसाठी जगभरातून आलेल्या विविध देशाच्या प्रतिनिधींना राज्यातील पर्यटनस्थळ, ऐतिहासिक वारसास्थळे, कृषी पर्यटन, वन्यजीव पर्यटनाची माहिती मिळावी, यासाठी सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे छोटेखानी प्रदर्शन (स्टॉल) उभारण्यात आले आहे. या माध्यमातून पर्यटन स्थळांची माहिती जागतिक पातळीवर पोहचण्यास मदत होईल, असे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. मंत्री लोढा म्हणाले की, राज्याला लाभलेला समुद्रकिनारा, विविध पर्यटन …

Read More »

मुंबईत महारोजगार मेळाव्यात ९ हजार २७८ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न कौशल्य विकासाबरोबर रोजगार उपलब्धतेला प्राधान्य - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाजवळील राणीबाग मैदानात आज झालेल्या महारोजगार मेळाव्यात अगदी पाचवी पास उमेदवारांपासून बीई, एमबीए अशा विविध पदवीप्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. पाचवी पास विद्यार्थ्यांसाठी डिलीव्हरी एक्झिक्युटीव्हच्या कामासाठी ३ हजार पदे उपलब्ध करुन देण्यात आली. होमकेअर नर्ससाठी एका कंपनीने २०० पदांसाठी मुलाखती घेतल्या. विविध कंपन्यांनी अशा एकूण …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत विविध ५०० कामांचे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आणि या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आवश्यक बाबी निश्चितपणे करण्यात येतील. प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे केले जाईल. येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प असून मुंबईकरांच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

Read More »

मंत्री लोढा म्हणतात राज्य सरकार ७५ हजार तर कौशल्य विकास ५ लाख जणांना नोकऱ्या देणार

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी सहभाग घेऊन ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात …

Read More »

नाना पटोलेंचे आव्हान, शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान असेल तर सत्ताधाऱ्यांनी…

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, परंतु या दैवताचा भारतीय जनता पक्ष वारंवार अपमान करत असून यातून भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे. राज्यापाल कोश्यारी, भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांच्यानंतर आता राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही महाराजांबद्दल गरळ ओकली आहे. सत्तेत असलेल्या आमदार व खासदार यांना छत्रपती शिवाजी …

Read More »

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये हेरिटेज वॉक सुरू

मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त …

Read More »

राज्यात ऑक्टोबरमध्ये २१ हजार उमेदवारांना रोजगार

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये २१ हजार ५२५ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात …

Read More »

‘अभ्यासक्रम सुचवा’ स्पर्धेत ६७ हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. कालपर्यंत तब्बल ६७ हजार ९९० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण …

Read More »