Breaking News

जगातील ११४.३१ हजार नागरिकांशी बडोले साधला ई-संवाद सरकारच्या योजना आणि अपेक्षांबाबतच्या सूचना मंत्र्यांनी स्विकारल्या

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील अनुसूचित जाती, दिव्यांग, ,विमुक्त आणि भटक्या जमाती, निराश्रित आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती तसेच या योजनांचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी साधलेल्या ई-संवादात जगभरातील ११४.३१ हजार नागरिक सहभागी झाले.
गुरूवारी सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी मागील ४ वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी आणि त्याचा लाभ मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी संवाद साधला. सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात
सामाजिक न्याय विभागाने राबविलेल्या कार्यक्रमांच्या यशस्वीतेबरोबरच ,योजनांमध्ये विविध समाज घटकांच्या गरजेनुसार काय सुधारणा करता येतील याबाबतही थेट लाभार्थ्यांशी संवाद साधून मंत्री बडोले यांनी सूचना स्विकारल्या.
केवळ राज्यातच नव्हे तर देशांतर्गत इतर राज्ये आणि अमेरीका, लंडन, आशिया खंडातील देशांतून सुध्दा मराठी नागरीकांनी मंत्री बडोले यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमात मा, मंत्री बडोले यांच्यासह समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर,बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, चर्मोद्योग विकास महामंडळाचे व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनुक्रमे राजेश डाबरे आणि कमलाकर यांनीही प्रेक्षक आणि लाभार्थी यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *