Breaking News

आपची संभाजी भिडेंच्या अटकेसाठी ऑनलाईन पिटीशन प्रीती शर्मा मेनन यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी

कोरेगाव भिमा येथे अभिवादन करण्यासाठी जमलेल्या दलित समाजाच्या विरोधात हल्ला करण्यासाठी उद्युक्त केल्याप्रकरणी मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. त्यामुळे भिडे यांना अटक करण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने ऑनलाईन पिटीशन दाखल करण्यात येणार असून या पिटीशनवर जास्तीत जास्त लोकांनी सह्या कराव्या असे आवाहन आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती शर्मामेनन यांनी केले.

कोरेगाव भिमा येथे झालेल्या हिंसाचारामागे मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याप्रकरणी त्यांच्यावर पुणे येथे अॅस्ट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच कोरेगाव भिमा येथे झालेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रासह देशातील इतर भागातही उमटत आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकातून म्हटले.

भिडे यांच्या नियोजित कार्यक्रमाला दिलेल्या परवानगी मुळे मुंबईत पुन्हा एखदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे त्यांच्या दिलेल्या कार्यक्रमाला परवानगी रद्द करावी आणि मुंबईत येण्यास बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी या पत्रकातून केली आहे.

त्याचबरोबर ही पिटीशन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

“माझीही सुरक्षा काढून घ्या”, आमचे नेते पवारसाहेबांचा मला फोन गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजपा (bjp) नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली म्हणून एकाबाजूला राज्य सरकारवर टीकेची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *