Breaking News

कोरोनामुळे नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे वर्षभरातील किमान एक अधिवेशन नागपूरात घेतले जाते. त्यानुसार नियोजित हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाय येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नियोजित नागपूरचे अधिवेशन यंदा मुंबईत घेण्याचा निर्णय आज झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यातील प्रमुख महानगरे असलेल्या मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये मागील काही काळात कोरोनाची संख्या सातत्याने वाढ होत होती. मात्र ऑक्टोंबर महिन्यात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर शहरातील संख्येत घट झाली. मात्र नागपूरातील कोरोनाबाधित आणि मृतकांच्या संख्येत सातत्याने वाढच होताना दिसत आहे. तसेच दुसरी लाट आली तर मुंबईहून नागपूरात गेलेल्या सर्व लोकप्रतिनिधींसह सरकारी कर्मचाऱ्यांनाही बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर येथील नियोजित अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनाचा कालावधी अद्याप निश्चित झालेला नाही. परंतु त्यासंदर्भात पुन्हा आयोजित केलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राज्याचे आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरला घ्यावे अशी मागणी काही नेत्यांनी केल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *