Breaking News

त्या प्रचार साहित्याशी भाजपचा संबध नाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी
खार येथे काल निवडणूक आयोगाने टाकलेल्या छाप्याचा भाजपाशी काहीही संबध नाही, हे आमचे प्रचार साहित्य नसल्याचा खुलासा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.
युनायटेड फॉस्फरस कंपनीच्या कार्यालयात भाजपच्या प्रचार साहित्याची छपाई होत असल्याचा भांडाफोड काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. तसेच याप्रश्नी पत्रकार परिषद घेत ही कंपनी भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या भावाची असल्याचा आरोप केला. त्यास तातडीने खुलासा भाजपने केला.
पवारांनी कलम ३७० संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी
घटनेचे कलम ३७० व कलम ३५ ए बाबत तुमची भूमिका स्पष्ट करा. कारण कलम ३७० जर तसेच ठेवले तर कश्मीर प्रश्न तसाच राहतो, पण जर कलम ३७० काढले तर काश्मीर प्रश्न आपोआप सुटण्यास मदत होते. दहशतवादी पाकिस्तानलाही हे कलम ठेवले पाहीजे असे वाटत आहे, त्यामुळे यासंदर्भात तुमची भूमिका काय आहे, असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज केला.
विरोधकांनी एकत्र येऊन जे काही तोडके मोडके महागठबंधन तयार केले आहे, त्याचीही यासंदर्भातील भूमिका स्पष्ट होणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.
विरोधक देशभरात एकत्र नाहीत, पण निवडणुकानंतर मात्र आपल्याला एकत्र यावे लागेल. निवडणुकीनंतर एकत्र येऊन भाजपशी लढावे लागेल, अशाप्रकारचे वक्तव्य सिताराम येचुरी करत आहेत. याचा अर्थ भाजप सत्तेत येईल आणि आपण विरोधात बसू असे येचुरी बोलत आहेत, कदाचित शरद पवारांना आधीच कळले होते म्हणुन ते निवडणुक लढले नाहीत, असेही ते म्हणाले.
निवडणुकांच्या काळातील कॉग्रेसच्या हालचालींची माहिती आयटीला कळल्यामुळे त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली असेल. निवडणुक आयोगानेही यामध्ये सरकारचा हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर आय. टी मध्ये काही चुकीच नसेल तर मग घाबरण्याचे काही कारणच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्यावेळी एनडीए स्थापना झाली, त्यावेळी एनडीए मध्ये विविध पक्ष होते. त्यावेळी एनडीए मध्ये असणाऱ्या फारुक अब्दुला यांनी भाजप आणि अन्य मित्र पक्षाचा मिनिमम प्रोग्रॅम मान्य केला होता. शरद पवार यांना आता गांधी कुटुंबाचे बलिदान व त्याग दिसत आहे, पण त्यांनी जेव्हां दोन वेळा कॉंग्रेस सोडली तेव्हां ते कॉंग्रेस बद्दल काय बोलले होते ते अद्याप जनता विसरलेली नाही. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीए मध्ये असलेल्या फारुक अब्दुलांची भूमिका तुम्हाला आज आठवत असेल तर कॉंग्रेस सोडताना तुम्ही कॉंग्रेसवर केलेली टिकाही तुम्हाला आठवायला हवी. फारुक अब्दुला आता एनडीएमध्ये नाहीत, त्यामुळे त्यांची भूमिका ही सध्याची आहे. ज्याप्रमाणे तुमची भूमिका बदलली त्याचप्रमाणे त्यांचीही भूमिका बदलली असावी, अशी खोचक टोलाही त्यांनी लगावला.
सध्या चॅनलवर दाखविण्यात येणाऱ्या मालिकांमधून भाजपा आपला निवडणूक प्रचार करत आहे, असा सध्या होत असलेला आरोप चुकीचा असून भाजपा मार्फत मालिका निर्मात्यांवर अथवा लेखकांवर कोणताही दबाव नाही. ज्याप्रमाणे तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकांमध्ये सातत्याने सामाजिक विषय घेतले जातात, त्याचपध्दतीने या मालिकांमध्येही तसे विषय घेतले असावेत. तरीही विरोधकांचा या संदर्भात काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोग हा विषय तपासून पाहील, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *