Breaking News

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे कोरोनाबाधित दोघांनी लोकांना काळजी घेण्याचे केले आवाहन

मराठी ई-बातम्या टीम
ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचार यांना आज कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन या दोन्ही नेत्यांनी केले आहे.
काल दिवसभर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे न्हावा शेव्हा प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी न्हावा शेव्हा येथे गेले होते. त्यांच्यासोबत एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते. तेथून परतल्यानंतर त्यांना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल आज सकारात्मक आला.
त्याचबरोबर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनाही काल प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनीही कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवालही सकारात्मक आला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना स्वतःची चाचणी करण्याचे विलगीकरणात राहण्याचे आवाहन केले.

 

 

Check Also

भाजपा आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून धक्का आणि दिलासा २७ जानेवारी पर्यत अटक करता येणार नाही

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय मत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *