Breaking News

पहिल्या दिवशी सर्वाधिक तरूण लसवंत ठाण्यात तर राज्यात १ लाख ८३ हजार लस ४ लाख ५० लाखाचे लक्ष्य होते

मराठी ई-बातम्या टीम
३ जानेवारीपासून देशभरातील सर्व १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार कालपासून लसीकरणास सुरुवात झाली. काल दिवसभरात १ लाख ८३ हजार २५९ तरूणांचे लसीकरण झाल्याची माहिती आज आरोग्य विभागाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. विशेष म्हणजे राज्यात तरूणांसाठी जारी करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून पहिल्या दिवशी तब्बल ४ लाख ५० हजार तरूणांना लस देण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. परंतु राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तरूणांचा फारच अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आहे. त्यामुळे काल दिवसभरात १ लाख ८३ हजार २५९ इतक्या जणांनीच लसीकरण मोहिमेला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून मुंबई, मुंबई उपनगरात कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळून येत आहेत. मात्र या तिन्ही शहरात कदाचीत कमी लसीकरणाची केंद्रे असल्याने लसीकरणास कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. राज्यात सर्वाधिक तरूणांनी लस घेण्याची संख्या तपासली असता ठाणे जिल्ह्यातील २० हजार ८७० तरूणांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. तर त्यानंतर पुणे जिल्ह्यात १७ हजार ५९७ जणांनी लस घेतली तर त्यानंतर अहमदनगरमध्ये १६ हजार ९६७, सांगलीत १४ हजार ५२९, कोल्हापूर १० हजार ३. धुळे येथे ९ हजार ३३१ जणांनी तर मुंबईत फक्त ५ हजार ९१७ जणांनी लसीची मात्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

तरूणांच्या लसीकरणांची जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणेः-

Check Also

मुंबईसह उपनगरात कोरोनाचा विस्फोट: तब्बल २१ हजार रूग्ण तर महाराष्ट्रात ५ हजार ओमायक्रॉनचे मुंबईत १०० तर राज्यात ४४ जण आढळले

मराठी ई-बातम्या टीम दिवस जसजसे जात आहेत तसतसे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत वाढ होत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *