शेतकरी भोळाभबाडा आहे. इतिहासात कधी नव्हे एवढी आपत्ती मराठवाडय़ात आली. हेक्टरी ५० हजार मिळालाय पाहिजे अशी आमची मागणी आहे. राज्य सरकार फक्त अभ्यास करत आहे. मी कसलीही मागणी नसताना कर्जमुक्ती केली. राज्य सरकारकडे कर्जमुक्ती साठी संपूर्ण यंत्रणा आहे. परदेशी समिती स्वदेशी शेतकर्यांची वाट लावणार आहे. पॅकेज ही थट्टा आहे. नुकसान भरपाई अजून कोणालाच मिळाली नाही. पीक विमा २ किंवा ३ रुपये देऊन शेतकर्यांची थट्टा सुरू असल्याची टीका शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून मराठवाड्यातील संभाजीनगर मधील पूरग्रस्त भागातील दौऱ्यावर आहेत. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आता कर्जमुक्ती केली तर बँकाना फायदा होईल असे म्हणतात तर जून मध्ये बँकांना फायदा होणार नाही याची माहिती द्यावी. न्याय मिळेपर्यंत शेतकर्यांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही देत दिवाळी अगोदर नुकसान भरपाई देऊ असे म्हणाले मदतीच्या नावाने आळस करत असून जून मुदत मान्य नाही लगेच कर्जमुक्ती करा अशी मागणीही करण्याचे आवाहन केले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी हताश झाला आहे. आता त्याला मदत केली नाही तर तो शेतकरी संकटात जाईल अशी भीती व्यक्त करत खोटे बोलणारे सरकार असून याच्या विरोधात उभे राहणे आहे. शेतकरी म्हणुन एकत्र आलो तरच न्याय मिळणार आहे. शेतकरी जमिनीतून कोंब फोडू शकतो तर राज्य सरकारला नक्कीच फोडणार असल्याची आशाही यावेळी व्यक्त केली.
तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री बिहार मध्ये प्रचार करत आहेत. कर्जमुक्ती झालीच पाहिजे…५० हजार हेक्टरी मिळेपर्यंत सरकारला धारेवर धरू आणि शेतकऱ्यासोबत राहणार असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya