Breaking News

उद्धव ठाकरे यांची सूचना ,… याचा राजकिय इव्हेंट होऊ नये इतकेच

लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिलेले असतानाच भाजपाच्या रणनीतीनुसार आणि जाहिरनाम्यातील आश्वासनानुसार राम मंदिर उभारणीच्या कामाला युध्द पातळीवर सुरु आहे. त्यातच तसेच मुख्य राम मंदिराचे उद्धाटन २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाचा राजकिय इव्हेंट होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत राम मंदिर होत आहे याचा आनंद असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मंदिराच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु येणार आहेत. तसेच इतर अनेक जण उपस्थित राहणार आहेत. परंतु राम मंदिराची चळवळ ज्यांनी सुरु केली त्या लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना मात्र राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केले नाही. त्यामुळे मला बोलवले नाही यात काही विशेष नाही असे सांगत अयोध्येतील राम हा काही कोणत्या एका खाजगी पक्षाची मालमत्ता नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आणि त्या आधीही मी गेलेलो आहे तसेच आम्हाला वाटलं की जातो असेही स्पष्ट केले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, जेव्हा बाबरी पाडली. त्यावेळचे सगळे भाजपाचे नेते गायब झाले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मस्जिद आमच्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा अभिमान असल्याचे सांगितले होते. याविषयीची माहिती लालकृष्ण अडवाणी यांनीच सांगितले होते. पण आता त्यावेळचे मंदिर चळवळीतील अनेकजण आता राहिले नाहीत.

त्यावर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली असता उद्धव ठाकरे म्हणाले की, कदाचीत त्याच्या वजनानेच पडली असेल म्हणून ते तसे बोलत असतील असा टोलाही लगावला.

आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही

देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीत येण्याच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी उत्सुक आहेत. मात्र वंचितला आघाडीत घेणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याचा वाद नव्याने पुढे आला. तसेच जागा वाटपाबाबतही १२ जागा देण्याचा प्रस्ताव दिल्याचेही बोलले जात असल्याबाबत विचारले उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, वंचितला आघाडी घेण्याबाबत शरद पवार यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलल्याचे सांगितले आहे. तसेच मी ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी बोललो आहे. आमचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांची प्रकाश आंबेडकर यांची एकत्रित बैठक घेण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. ज्यावेळी आम्ही सगळे एकमेकांसमोर असून त्यावेळी चर्चा काय आणि प्रत्यक्ष काय याबाबत बोलता येईल. तसेच जागा वाटपा बाबतचा कोणताही प्रस्ताव माझ्यासमोर आलेला नसल्याचे सांगत आघाडीत बिघाडी होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले.

मावळची उमेदवारी अजित पवार यांचे समर्थक संजोग वाघेरे यांना

दरम्यान, अजित पवार यांचे खंदे समर्थक सुनिल वाघेरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजोग वाघेरे यांना मावळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीही जाहिर केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *