Breaking News

अयोध्येत विमानतळ, रेल्वेचे उद्धाटन करत पंतप्रधान मोदींकडून १५ हजार कोटींच्या…

देशातील तमाम हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील असलेल्या कथित राम जन्मभूमी परिसरात राम मंदीर उभारण्यात येणार आलेले आहे. तसेच त्याचे उद्घाटन २०२४ च्या पहिल्याच महिन्यात २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी पर्यटक आणि भाविकांसाठी प्रवासाच्या दृष्टीकोनातून विमानतळ आणि नव्या रेल्वे स्थानकाचा निर्माण करण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा वास्तूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिधिंया यांच्यासह विविन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अयोध्येतील राम मंदीराचे लोकार्पण करण्याच्या जानेवारी महिन्याच्या २२ तारखेला आणखी २३ दिवस शिल्लक राहिलेले आहेत. यापार्श्वभूमीवर अत्याधुनिक विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या विमानतळाच्या आतील बाजूस सुशोभिकरण आणि सुर्याचा प्रकाश व्यवस्थित प्रत्येत ठिकाणी पोहचेल अशा दृष्टीकोनातून छताला काही रंगीत काचांचा वापर करण्यात आला आहे. तसेच या काचांवर राम लक्ष्मण सीता यांची काही चित्रेही त्या काचांवर निर्माण करण्यात आली आहेत. तसेच विमानतळ इमारतीची बाह्यरचनेचे काम एखाद्या मंदिराप्रमाणे करण्यात आली आहे. मात्र त्यास नाव दिले आहे श्री महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे विमानतळ जवळपास वर्षभरात उभारण्यात आल्याचे सांगण्यात येत असून केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाची उभारणी केली आहे.

तसेच अयोध्येत हिंदू धर्मातील काही प्रथांनुसार काही प्रतिकांचा वापर करण्यात येणार असून देशभरातील पर्यटकांना आणि परदेशी पर्यटकांना अयोध्येत प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी रामायणातील प्रसंगानुरूप प्रतिमा निर्मितीही करण्यात आला आहे. तसेच हिंदू धर्मातील चारोधाम मध्ये आता अयोध्येतील राम मंदिराचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर मोक्ष मिळावा आणि हिंदू धर्मातील सात ठिकाणे सांगितली आहेत त्यासाठी धर्मरिवाजानुसार सात ठिकाणेही ( मोक्ष दाहिनी सप्त पुरिस) ही उभारण्यात येणार आहे.

तसेच अयोध्या रेल्वे स्थानकाचे नामकरण आता अयोध्या धाम असे करण्यात आले असून हे स्थानक नव्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्यासाठी २३०० कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच या स्थानकावरून सोडण्यात आलेल्या ६ नव्या रेल्वे गाड्यांनाही हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविला.

तसेच महर्षी विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या दोन अमृत भारत आणि ६ वंदे भारतच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला. याशिवाय १५ हजार ७०० कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजनही केले. ही सर्व विकासकामे एकट्या अयोध्येत नाही तर संपूर्ण उत्तर प्रदेशात करण्यात येणार आहेत.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *