Breaking News

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, धारावीच्या आडूण मुंबई गिळू देणार नाही कोरोना काळात सेंटर्सची जमिन बुलेट ट्रेनला दिली

देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी झोपडपट्टी आता एका उद्योपतीच्या घशात घालण्याचा डाव आखला जात आहे. तुम्ही पाह्यलं असेल तो कोण आहे आणि कोणाचा मित्र आहे ते असा उपरोधिक सवाल करत मी तर त्याला पाहिला नाही. पण तुम्ही त्याला पाह्यला असेल तो कोणाचा मित्र आहे. जे काही असेल ते घाल मित्राच्या घाशात असं यांचं हिंदूत्व असल्याची टीका करत त्यांच्या माणसांची व्यवस्था व्हावी म्हणून ते त्यांच्या मित्राला धारावी दिली. पण धारावीच्या आडून मुंबईला गिळू पहात असाल तर ती मी गिळू देणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे नाव घेता दिला.

दादर येथील शिवाजी पार्क मैदाना शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, आम्ही कोरोना काळात लोकांचे जीव वाचविण्यासाठी कोरोना सेंटर्स उभारले ती जागा हे गद्दार त्यांच्यासोबत सत्तेत आल्यानंतर पहिले काम कोणते केले. तर तर ते सगळे कोरोना सेंटर्स बंद करून ती जागा बुलेट ट्रेनला दिली. कोरोना सेंटर्स उभारले ते आम्ही लोकांचे जीव वाचविले. पण यांनी ती बुलेट ट्रेनला दिली. बरं त्या बुलेट ट्रेनचा काय उपयोग तर गद्दारांना पुन्हा सूरतला पळून जाण्यासाठी उभारत असावेत अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मध्यंतरी काही जण हनुमान चालिसा म्हणायची एक टूम निघाली होती. म्हणे आम्ही मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणू. अरे तुम्हाला खरीच हनुमान चालिसा म्हणायची आहे तर तुम्ही जा ना तिकडे मणिपूरमध्ये तिकडे म्हणून दाखवा असे टीकास्त्र अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्यावर नाव न घेता सोडले. तसेच म्हणाले तुम्हाला व्यकंटेश स्त्रोत आहे ते माहित आहे का, त्यातील ओळी अद्घृत करत पुढे म्हणाले की, शहरातील गटारांमधून लेंढकी-घाण वाहून येते, भलेही ती कावळ्याची विष्ठा असली तरी ती गंगेला मिळाल्यावर पवित्र होत नाही. फक्त त्यात मिसळून जाते असा उपरोधिक टोलाही लगावला.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर असतानाची आठवण सांगताना म्हणाले, मी राज्याचा मुख्यमंत्री असताना काहीजण माझ्याकडे अर्ज घेवून आले. त्यावेळी त्यांनी मला एक प्रश्न विचारला की, तुम्हाला काही दृष्टांत वगैरे मिळतो का तुम्ही सगळी मंदीर बंद ठेवता. ती सुरु करा अशी मागणी करू लागले. त्यावर मी उत्तर दिले की, मला दृष्टांत वगैरे काही नाही. पण आमचं हिंदूत्व हे देवळातील घंटानाद करणार नाही तर लोकांचा जीव वाचविणार आणि देशाच्या शत्रुंशी दोन हात करणारं हिंदूत्व असल्याची आठवण सांगितली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानत म्हणाले, आपल्या काळात शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ त्यांच्या खात्यावर पोहोचवली. तर आता काही दिवसांपूर्वी मी मुंबईच्या पावसात भिजलो पण जेव्हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलो तर तेथील पीकं पावसा अभावी करपून गेली होती. या गद्दारांचे सरकार आल्यापासून अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले. त्यावेळी त्यांच्या सरकारने पीक विमा कंपन्यांना नुकसान भरपाई द्यायला सांगितले. तर त्या कंपन्यांनी सरळ हात वर करत सरकारला सांगितले की, नुकसान झाल्यानंतर ४८ तासाच्या आत त्यांनी नुकसान भरपाई मागितली नाही. त्यामुळे आम्हाला ती देता येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. जरा बघा त्या कंपन्या कोणत्या आहेत कदाचित त्यांच्या मित्राच्याच असतील त्या बघा असा नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, मध्यंतरी नरेंद्र मोदी बोलले आम्हाला परिवार वाद मोडून काढायचा आहे. पण त्यांना त्यांच्याच पक्षातील परिवार वाद दिसत नाही अशी टीका करत उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, अहो त्यांच्या मागे आगा ना पिच्छा ना त्यांच्या परिवाराचा पत्ता ना कुणाचा त्यांनीच सांगितले होते की, मै तो क्या हू फकीर हूँ झोला उठा के चल दिया असे म्हणणाऱ्याला परिवार वाद म्हणजे काय हे कसं कळणार असा उपरोधिक टोला नरेंद्र मोदी यांना लगावत देशाला हे आधी भीकेला लावणार आणि नंतर म्हणणार मै तो फकीर हूँ. अशा व्यक्तीचा कारभार आपण पाहिला असून आता अशा व्यक्तीला पदावरून घालविण्याची वेळ आल्याचे श्रोत्यांना निर्धारपूर्वक सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *