Breaking News

राज ठाकरे, आदित्य ठाकरेनंतर आता नाना पटोले अयोध्येचा दौऱ्यावर दशरथ गढीच्या महंताकडून पटोलेंना निमंत्रण

अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना आणि मनसेत असली नकली हिंदूत्वावरून राजकारण सुरु झालेले असताना आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर थेट भाजपाच्या खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले असतानाही राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचा पुर्नरूच्चार केला. त्यापाठोपाठ शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे हे ही अयोध्या दौरा जाहिर केल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अयोध्येला जाण्याची तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.
अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले असून पटोले यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला.
राज्यात हनुमान चालीसा आणि भोंग्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात हिंदुत्वाचा मुद्दा उचलून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौ-याची घोषणा केली. त्यांच्या या दौ-याची जय्यत तयारी सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील भाजपा एका खासदाराने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याला तीव्र विरोध केला आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे हे येत्या ५ जूनला आयोध्येचा दौरा करणार की नाही अशी संभ्रमावस्था असतानाच शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे आयोध्येच्या दौऱ्याचा कार्यक्रम शिवसेनेकडून जाहिर करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा नियोजित दौरा ५ जूनला निश्चित करण्यात आला आहे. तर आदित्य ठाकरे हे येत्या १० जूनला आयोध्येच्या दौ-यावर जाणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली.
ठाकरे काका पुतण्यांच्या या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आयोध्येच्या दौ-यावर जाणार आहेत. अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी आज टिळक भवन, नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान त्यांनी नाना पटोले यांना प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला भेट देण्याचे निमंत्रण दिले. नाना पटोले यांनी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. मात्र पटोले आयोध्येला केव्हा जाणार हे स्पष्ट झाले नाही.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *