Breaking News

चंद्रकांत पाटील म्हणाले, उध्दव ठाकरेंना उत्तर देणार १५ मेच्या सभेतून आम्ही उत्तर देऊ

या राज्यात आता न्यायालय सोडून बाकी कोणाकडून न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे सुरुवातीला आरोप करायचा, मग एफआयआर दाखल करायचा, मग एफआयआर न्यायालयात नुसता फेटाळला गेला की न्यायालय ठोकतं, जसं राजद्रोहाच्याबाबत ठोकलं. मग काहीच नाही तर महापालिकेडून घरावर नोटीस जाईल. मग त्या नोटीशीला देखील उच्च न्यायालयात स्थगिती मिळणार. असा सामान्य माणसाला त्रास देण्याचा आणि हम करे सो कायद्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १४ मे रोजी मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात सभा घेणार आहेत. तर त्यांच्या सभेला भाजपाकडून देखील उत्तर दिलं जाणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर म्हणजे १५ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे, या सभेतून आम्ही उत्तर देऊ असेही त्यांनी सांगितले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं.
हुंकार सभेनंतर १५ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. त्या हुंकाराला काय उत्तर द्यायचं ते देऊ.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा यावरून राजकीय वातावरण तापवलं आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांचे आरोपसत्र सुरूच असून भाजपासमर्थक खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी देखील मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान देत मोठा गोंधळ निर्माण केला होता.
तर, आज शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन नवनीत राणा यांच्या तपासण्याचे व्हिडीओ आणि फोटोंवरून रुग्णालय प्रशासनास धारेवर धरले. या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेना आता आपण सरकारमध्ये आहोत, हे विसरून पुन्हा एकदा मूळ शिवसेनेच्या मूडमध्ये आलेली आहे. लोक याची दखल घेतील.
याचबरोबर, या राज्यात आता न्यायालय सोडून बाकी कोणाकडून न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे सुरुवातीला आरोप करायचा, मग एफआयआर दाखल करायचा, मग एफआयआर न्यायालयात नुसता फेटाळला गेला की न्यायालय ठोकतं, जसं राजद्रोहाच्याबाबत ठोकलं. मग काहीच नाही तर महापालिकेडून घरावर नोटीस जाईल. मग त्या नोटीशीला देखील उच्च न्यायालयात स्थगिती मिळणार. असा सामान्य माणसाला त्रास देण्याचा आणि हम करे सो कायद्याचा प्रयत्न सुरू आहे असं सुरु असल्याचा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *