Breaking News

शिर्डीत आलो अन कोल्हापूरात…केसरकरांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, या आमच्याकडे… शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांचा मिश्किल टोला

राज्यातील शिंदे गटातील आमदार मंत्र्यांना काय झालेय कळायला मार्ग नाही. शिंदे गटाचा एक आमदार सकाळी म्हणाला त्या स्त्रीचे सौंदर्य पाहून खासदारकी दिली. तर मंत्री म्हणतो शिर्डीत आलो अन् कोल्हापूरात पूराच्या पाण्यात एका फुटानेही वाढ झाली नाही. शिंदे गटाच्या या मंत्र्याचा मात्र अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मिश्किल टोला लगावत या मंत्र्याला जरा जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला.

झाले असे की, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे शिर्डी येथे आले होते. त्यानंतर नाशिक दौऱ्यात शिक्षण विभागाची बैठक घेतली. बैठकीदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना मंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा पूर परिस्थिती असताना मी योगायोगाने शिर्डीत होतो. कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून पाणी सोडले, की ५ फूट लेव्हल वाढते. पण, यंदा योगायोगाने मी शिर्डीत होतो. त्यामुळे एक फुटाने पण लेव्हल वाढली नाही, ही वस्तुस्थिती आहे, देवाकडे मी प्रार्थना करत होतो. पाटबंधारेकडे तुम्ही चौकशी केली तर ५-६ फूट पाण्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असती. निसर्गात पण देव आहे, असं सांगत स्वतःला एकप्रकारे दैवी सिध्दी असल्याचे एकप्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आज मंत्री छगन भुजबळ देखील नाशिक मध्ये उपस्थित होते. माध्यम प्रतिनिधींनी मंत्री दीपक केसरकर यांच्या या वक्तव्याबाबत प्रश्न केला असता मंत्री भुजबळ यांनी पहिल्यांदा हात जोडले. भुजबळ म्हणाले, तुम्ही इकडे या आनंद आहे, तुम्ही सुद्धा देवाचा धावा करा आणि आमच्या इकडची धरणे लवकर लवकर भरू द्या आमची सगळी धरणे ५० टक्क्यांच्या खाली आहेत एखादं धरण भरलेलं आहे असा मिश्किल टोला लगावला.

मंत्री दीपक केसरकर यांच्या या दाव्यावर सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीने प्रतिक्रिया आता व्यक्त केल्याने केसरकर हे किमान जमिनीवर येतील असे मानायला हरकत नाही अशी चर्चा नाशिककरांमधील जाणकारांमध्ये सुरु झाली.

Check Also

अरविंदरसिंग लवली अखेर भाजपामध्ये दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी आप AAP सोबतच्या युतीमुळे अलीकडेच दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे अरविंदर सिंग लवली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *