Breaking News

अखेर ठरलं वंचित आघाडी आणि ठाकरे गटाची युती

आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये युती बाबत सकारात्मक चर्चा झाली असून वंचित आघाडीच्या वतीने सकारात्मकता कळविण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी चौथा घटक पक्ष असेल की, वंचित आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटासोबत असेल याबाबत स्पष्टता होणार असल्याची माहिती आघाडीच्या प्रवक्त्या रेखा ठाकुर यांनी दिली.

शिवसेना ठाकरे गटा सोबत युती अथवा आघाडी करण्याबद्दल चर्चा सुरु आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या बाजुने आम्ही होकार कळविण्यात आला आहे. अशी माहिती देताना रेखा ठाकुर म्हणाल्या की, वंचित आघाडीच्या वतीने पक्षाचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या शिष्टमंडळाने शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुभाष देसाई तसेच अन्य काही शिवसेना नेते यांच्या बरोबर दोन बैठका झाल्या आहेत. त्यात युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली असे त्यांनी सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली घेतली. त्यांच्यातही दोन बैठका झाल्या आहेत. त्यामध्येही सकारत्मक चर्चा झालेली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग बनविणार आणि चार पक्ष मिळून आघाडी करून निवडणूक लढवणार की, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी असे मिळून निवडणुका लढवणार? या टप्प्यावर चर्चा आलेली आहे त्यांच्याकडून (ठाकरे गट) स्पष्टता आली की, पुढच्या टप्प्यातली चर्चा सुरू होईल या बाबतीतला निर्णय त्यांच्या कडून येणे आपेक्षित असल्याचे रेखा ठाकुर यांनी सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *