Breaking News

भाजपाची नवी केंद्रिय कार्यकारणी जाहिरः महाराष्ट्रातील या नेत्यांचा समावेश विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजय रहाटकर यांना स्थान

लोकसभा निवडणूकीला अवघे १० महिने राहिलेले आहेत. या निवडणूका काहीही करून जिंकायच्याच या उद्देशाने भाजपाने सध्या देशभरातील प्रत्येक राज्यातील प्रबळ प्रादेशिक पक्षांमध्ये फुट पाडणे. आणि भाजपा प्रणित राज्य सरकारची स्थापना करणे आणि मृत अवस्थेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची नव्याने बांधणी करण्याचे काम भाजपाकडून सध्या सुरु आहे. तर दुसऱ्याबाजूला पक्षांतर्गत केंद्रीय संघटनेत प्रत्येक राज्यातील जात समुहाला स्थान देण्याच्या उद्देशाने भाजपाने नवी कार्यकारणी जाहिर केली असून प्रत्येक राज्यातील वजनदार नेत्याचा समावेश या कार्यकारणीत केला आहे. परंतु नवी कार्यकारणीत स्थान देताना आगामी काळात होऊ घातलेल्या राज्यांमधील विधानसभा निवडणूकाही लक्षात घेण्यात आल्याचे कार्यकारणीच्या नावावरून लक्षात येत आहे.

लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरावी अशा काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढच्या काही महिन्यांत होणार आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्ट्र अशा काही महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपाने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून एकूण १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस व १२ सचिवांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू व उत्तर प्रदेशमधील आमदार तारीक मन्सूर यांचा समावेश उपाध्यक्ष म्हणून करण्यात आला आहे. तसेच, तेलंगणा भाजपाचे माजी अध्यक्ष बांडी संजय कुमार यांचाही समावेश पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून करण्यात आला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांचाही समावेश भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीत केला असून त्यांच्याकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच अनिल अँटनी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय पंकजा मुंडे व विजया रहाटकर यांचा समावेश राष्ट्रीय सचिव म्हणून करण्यात आला आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीतून कर्नाटकमधील पक्षाचे नेते सी. टी. रवी व आसाममधील लोकसभा खासदार दिलीप साकिया बिहारमधील लोकसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांनाही पक्षाच्या उपाध्यक्षपदावरून हटवत कार्यकारणीच्या बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *