Breaking News

संजय राऊत म्हणाले, मंत्री महोदय, ही धमकी समजायची का? शंभूराज देसाई यांच्या आव्हानवर संजय राऊत यांचा पलटवार

 

कर्नाटकातील भाजपा सरकारचे मुख्यमंत्री  बसवराज बोमेमई यांचे वक्तव्य आणि कर्नाटकच्या कुरापती यामुळे गेली अनेक वर्ष चाललेला आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद पुन्हा तापला आहे. या कुरापतीवरून शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले आहे.

शिवरायांचा अपमान महाराष्ट्राचे सरकार सहन करीत आहे. सीमावादावर कर्नाटक सरकार महाराष्ट्राला आव्हान देत आहे. याबाबत शिवसेना प्रवक्ते संजय राऊतला आत टाकण्याची भाषा, कायदा न्यायपालिका तपास यंत्रना खिशात आहेत, असे शंभुराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे असेल तर मी तयार आहे असे ट्विट करीत संजय राऊत यांनी पुन्हा सरकारला धारेवर धरले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य आणि त्यानंतर चाललेल्या कुरघोड्या यावर महाराष्ट सरकार गप्प बसल्याने हे सरकार डरपोक आहे, पळकुटे आहेत. तसेच नव्हेतर राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना षंड म्हटले होते. त्यावरून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना इशारा देत संजय राऊत यांनी तोंड आवरावे, त्यांना सीमावादावर बोलण्याचा काहीएक अधिकार नाही. राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असा इशाराही देसाई यांनी दिला.  संजय राऊत यांच्यावर टिका करताना मंत्री शंभुराजे देसाई असेही म्हणाले की, आताच तुम्ही साडेतीन महिन्यांचा तुरूंगात आराम करून तुरुंगातून बाहेर आला आहात. तुरुंगा बाहेरील वातावरण तुम्हाला मानवत नाही असे दिसत आहे. म्हणूनच तुम्ही अशी वक्तव्ये करत आहात. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्ये करणे टाळा. अशा प्रकारे टिका करून मंत्री शंभूराज देसाई यांनी एकप्रकारे संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवू, अशी धमकीच दिला. संजय राऊत यांनी ही धमकी समजायची का? असा प्रतिप्रश्न मंत्री देसाईंना विचारला आहे.

मंत्री महोदय, महाराष्ट्राच्या बाजूने लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. असा सवाल करीत सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेच्या प्रश्नावर शांत आहे म्हणून जनता शांत बसणार नाही. कायदा आणि न्यायालये तुमच्या दबावाखाली आहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील. हाच याचा अर्थ आहे का असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर चर्चेतून मार्ग काढत आहोत. पण उगाच या वादाचा राजकीय फायदा घेतला जात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना संजय राऊत षंड म्हणालेत. त्यांचा मी धिक्कार करतो. समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. असे असताना संजय राऊत यांनी स्वतः लढ्यात उतरावे आणि मग मुख्यमंत्र्यांवर टिका करावी, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *