Breaking News

जगनमोहन रेड्डी यांच्यावरील हल्ल्याची निवडणूक आयोगाचे घेतली दखल

काल रात्री आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या प्रचार यात्रेच्या दरम्यान काही अज्ञात जमावाकडून त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत जगनमोहन रेड्डी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांना अधिकची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वायएसआर काँग्रेसच्या काही नेत्यांनी या दगडफेकीवर टीडीपी अर्थात तेलगू देसम पक्षाच्या नेत्यांवर संशय व्यक्त केला.

दरम्यान, मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्यावरील दगडफेकीच्या हल्ल्यातची दखल कालच १३ एप्रिल रोजी भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निदर्शनास आली, मुकेश कुमार मीना, आंध्र प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांना या घटनेचा तपशीलवार अहवाल पाठवण्यास सांगण्यात आले.

मीणा यांनी रविवारी सांगितले की, “ईसीआयच्या निर्देशानुसार, मी रात्री विजयवाडा पोलिस आयुक्तांशी बोललो आणि त्यांना एका दिवसात घटनेचा अहवाल पाठवण्यास सांगितले आणि हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. बदमाशांना लवकरात लवकर अटक करण्यास सांगितले सांगितले.

मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून शनिवारी रात्री ८ ते ९ या वेळेत विजयवाडा येथे ‘मेमंथा सिद्धम’ बस यात्रा आणि रोड शो दरम्यान काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केली.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगनमोहन रेड्डी यांना लवकरात लवकर बरे व्हा असा ट्विटरवरून संदेश पाठविला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *