Breaking News

शिवसेना आक्रमक तर एकनाथ शिंदे गटाला हादरा विधानसभेकडून १६ जणांना नोटीस

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील १६ बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना आपात्र का ठरविण्यात येवू नये अशा आशयाची नोटीस आज गुवाहाटीस्थित आमदारांना बजावली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटातील दोन आमदारांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात आणलेला अविश्वासाचा ठरावही झिरवळ यांनी याची पडताळणी केल्याशिवाय मान्य करता येत नाही असे सांगत फेटाळून तुर्तास फेटाळून लावला आहे. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला हादरा बसल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांची कार्यालयेदेखील फोडण्यात येत आहेत. शिवसैनिकांची हीच आक्रमकता लक्षात घेऊन राज्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून ठिकठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे देखील माघार घेण्यास तयार नसून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेला शिवसेनेचा नवा गट स्थापन केल्याचे म्हटले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. नोटिशीचे उत्तर न दिल्यास या आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते.

या १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. याच मागणीची दखल घेत झिरवळ यांनी ही नोटीस बजावली असून त्यांना ४८ तासांचे अल्टिमेटम दिले आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील बंडखोर आमदार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या नोटिशीनंतर शिंदे गटातील आमदार न्यायालयात जाण्याची शक्यता असून झिरवळ ते यांच्या नोटिशीला आव्हान देण्याची शक्यता आहे. या नोटिशीबद्दल बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी फोनवरून बोलताना म्हणाले की, आम्हाला नोटीस देण्यात आली हे खरं आहे. काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना उत्तर दिलं जाईल. निलंबन होणार नाही. कोर्टात जाण्याची वेळ आली तर ते करावे लागेल. आम्ही लांब आहोत, कोणाला तरी घरी नोटीस दिली आहे. आम्ही अजूनही कोणत्या पक्षात गेलेलो नाही. पक्ष सोडलेला नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय. बैठकीला का येऊ शकलो नाही त्याबद्दल उत्तरात सांगू. नोटिशीला उत्तर देऊ. एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत प्रक्रिया सुरु केली आहे. काळजीचे कारण नाही असेही स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील या आमदारांना नोटीसा

एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संजय रायमुलकर, संजय शिरसाठ, तानाजी सावंत, लता सोनावणे, भरत गोगावले, महेश शिंदे, शहाजी पाटील, प्रकाश सुर्वे, रमेश बोरनारे, बालाची किणीकर, चिमणराव पाटील, सुहास कांदे, अनिल बाबर, बालाजी कल्याणकर आदी आमदारांना अपात्र का करण्यात येवू नये यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नोटीस बजावली आहे.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *