Breaking News

Tag Archives: narhari zirwal

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली जनजाती सल्लागार परिषेदची बैठक

केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य जनजाती सल्लागार परिषदेमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच राज्याच्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत, लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, आदिवासी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय सुरू करणे आदी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा …

Read More »

अजित पवार म्हणाले, खरं तर हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत येतो पण… सप्तश्रृंगी गडाच्या ८१ कोटी ८६ लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजूरी देणार

वास्तविक पाहता हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतो. पण मी तुम्हाला शब्द देतो की, मी उद्याच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून बैठक घ्यायची विनंती करून सप्तश्रुंगी गडाच्या विकासासाठी ८१.८६ लाख रूपयांच्या निधीस मंजूरी देतो. आणि तसे पत्र तुम्हाला दिसेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित …

Read More »

नाशिक जिल्हा बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सहकार्य करेल सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

जिल्ह्याच्या अर्थकारणात सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुग्ध संस्था, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका, नागरी पतसंस्था, सहकारी साखर कारखाने, शेतकरी व इतर सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या उभारणीत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.या बँकेचे योगदान मोठे राहिले आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम …

Read More »

आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश होणार मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

आदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. मंत्रालयात आयोजित क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना …

Read More »

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले,…निर्णय मान्य केला जाईल तर निर्णय माझ्याकडेच येईल

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी लागणार आहे. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीच यासंबंधीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राचे सरकार कोसळणार की राहणार या कळीच्या प्रश्नाचं उत्तरही गुरुवारी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल विधीमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही सविस्तर प्रतिक्रिया दिली …

Read More »

अब्दुल सत्तार म्हणाले, नरहरी झिरवळांना हटविणार निकालासाठी थांबलो होतो पण आता नाही थांबणार

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाले. परंतु या दोन्ही नेत्यांचा शपथविधी होवून एक महिना पूर्ण झाला तरी अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यापार्श्वभूमीवर बंडखोर शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाच्या निकालासाठी आम्ही थांबलो होतो. मात्र आता …

Read More »

शिवसेनेच्या व्हिपवर शरद पवार म्हणाले, बंडखोरांना व्हिप पाळावाच लागेल अन्यथा… विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी अद्यापही नरहरी झिरवळ

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आणि अध्यक्ष पदाचे अधिकार असलेले अजूनही नरहरी झिरवळ आहेत. कायद्याने त्यांना अधिकार असल्याने, त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांची आम्ही बैठक घेऊन, एकत्रित अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार आहोत. पक्ष म्हणून विधानसभेतील व्हिप आणि संघटनात्मक काम या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे गटनेत्याने दिलेला व्हीप आमदारांना …

Read More »

उध्दव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले, माझ्या विरोधात मतदान करणाऱ्यांना बघायचाय काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरील बैठकीत केली भूमिका स्पष्ट

राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरु केलेल्या कारवाईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तसेच त्यासंदर्भातील सुनावणी अद्याप प्रलंबित असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अचानक महाविकास आघाडी सरकारला आपले बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर शिवसेना, …

Read More »

शिवसेना आक्रमक तर एकनाथ शिंदे गटाला हादरा विधानसभेकडून १६ जणांना नोटीस

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील १६ बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना आपात्र का ठरविण्यात येवू नये अशा आशयाची नोटीस आज गुवाहाटीस्थित आमदारांना बजावली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटातील दोन आमदारांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या …

Read More »

९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात भव्यदिव्य ग्रंथदिंडीचे नाशिककरांकडून उत्साहात स्वागत

मराठी ई-बातम्या टीम कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात भव्य ग्रंथदिंडीने करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पूजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी …

Read More »