Breaking News

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत मंजूर केले ‘हे’ पाच ठराव शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून माझ्यावर काकणभर जास्त प्रेम

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड क्षमविण्यासाठी अपयश आल्यानंतर आता शिवसेनेतील आणखी होवू पाहणारी पडझड रोखण्यासाठी तातडीने राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत महत्वाचे पाच ठराव मंजूर करण्यात आले आहे. या बैठकीत प्रामुख्याने शिवसेना हे नाव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पक्षाशिवाय इतरांना वापर करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत मंजूर झालेले ५ ठराव खालीलप्रमाणे

१. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कार्यकारणीचा पूर्ण विश्वास आहे. पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत.
२. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांना देत आहे.
३. बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही.
४. शिवसेना बाळासाहेब ठाकरे याची होती, आहे आणि कायम राहील.
५. शिवसेनेची मराठी अस्मितेशी व हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील.

या बैठकीत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माझी पक्षप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर तेव्हा पक्षांतर्गत नाराजी होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना मी घेतलेली भूमिका सांगितले. मी बाळासाहेबांना म्हणालो हे सगळे काय करतायत ते तुम्ही तरी थांबवा. ते मला म्हणाले मी मध्ये नाही पडणार. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ दे. मग शेवटी तो ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना विचारलं होतं की हे जे सगळं केलंय, ते तुम्हाला मान्य आहे का? अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना परखड शब्दांत सुनावताना म्हणाले की, काय तुमचं कर्तृत्व? हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा, आधी नाथ होते, आता दास झाले असा खोचक टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.  बंडखोरांनी त्यांचा निर्णय घ्यावा. बाळासाहेबांचं नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही. शिवसेना निखारा आहे. पाय ठेवाल तर जळून जाल, असेही ते यावेळी म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा आपल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांचं काकणभर जास्तच प्रेम आहे. शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून अनेकांना मी सांगतो. तुम्ही हसाल. पण जर शिवसैनिकांना विचारलं तर तो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांपेक्षा माझ्यावर काकणभर जास्तच प्रेम करत असेल. कारण केवळ मी त्यांचा मुलगा आहे म्हणून असेही ते म्हणाले.

Check Also

राहुल गांधी यांचा रायबरेलीतूनही अर्ज दाखल, तर अमेठीतून के एल शर्मा

यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या काही दिवस आधी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून यावेळी उमेदवारी अर्ज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *