Breaking News

संजय राऊत यांच्या त्या टीकेला दिपक केसरकर यांचे प्रत्युत्तर, …तुमचे बाबा आहेत टेस्ट ट्युब बेबी या टीकेला दिले खोचक प्रत्युत्तर

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या शिवसेना आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावरून उध्दव ठाकरे आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या न्यायालयीन लढाईबाबत बोलताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही शिंदे गटाला मिळणार असल्याचे भाकित केले. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत शिंदे गटाला ‘टेस्ट ट्यूब बेबी’ म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मिंधे गटाच्या टेस्ट ट्यूब बेबीला मांडीवर बसवलं असल्याचा टोला लगावला. राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं असून मुख्यमंत्री हे टेस्ट ट्यूब बेबी नसून तुमचे बाबा आहेत, असा पलटवार केला.

मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

यावेळी बोलताना दिपक केसरकर म्हणाले, विरोधकांकडे सध्या कोणतेही मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत. त्यांनी अडीच वर्षात काय केलं, हे त्यांना सांगता येत नाही. आज केवळ लोकांशी दिशाभूल करणं सुरू आहे. एखादा मुद्दा उचलून आम्हाला बदनाम करण्याचे काम सध्या ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे असल्याची टीका ठाकरे गटावर केली.

पुढे बोलताना त्यांनी संजय राऊतांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत आमच्या मुख्यमंत्र्यांना टेस्ट ट्यूब बेबी म्हणाले. मात्र, ते बेबी नाही तर तुमचे बाबा आहेत. तुम्हाला त्यांनी हाकलून लावलं असतं. त्यांच्या स्वाभिमानाला ठाकरे गटाने धक्का दिला. युवा सेनेचे लोकं आमच्यावर पाळत ठेवत होते. आमच्या मागे गाड्या घेऊन फिरत होते. आमच्या घरावर पहारा देत होते. ही कोणती पद्धत आहे. मुळात आमचा स्वाभिमान किती जाज्वल्य आहे, याची प्रचिती तुम्हाला येणाऱ्या काळात दिसून येईल, असा इशाराही केसरकरांनी राऊत यांना दिला.

राज्यात लवकरच आम्ही ‘पीएमश्री’ या शाळा सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये मुलं कॉपी करतात. त्यामुळेच आम्ही राज्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवणार असल्याचेही ते म्हणाले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *