Breaking News

ठाकरे यांच्या दौऱ्यावरून अब्दुल सत्तारांची टीका, शेतकऱ्यांसाठी फक्त २४ मिनिटे

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आज रविवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीही घेणार आहेत. या दौऱ्यावरून भाजपाने त्यांच्यावर टीका केलेली असताना, आता राज्याचे कृषीमंत्री तथा शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही निशाणा साधला.

मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी त्यांच्या दौऱ्यातील मिनीट टू मिनीट कार्यक्रम पाहिला त्यानंतर असं दिसून आलं की २४ मिनिटांसाठी ते शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत. आता यावेळेत ते किती पाहातील, काय पाहातील, किती ओला दुष्काळ पाहातील असा खोचक टोलाही उध्दव ठाकरे यांना लगावला.

मला हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता परतीचा पाऊस संपलेला आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने दौरा काढला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानेल. किमीत कमी यंदा तरी अडीच वर्षानंतर त्यांचा दौरा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येऊ लागला, याबद्दल त्यांना धन्यवादच द्यावे लागतील. २२-२४ मिनिटं का असेना पण आले पाहणी करतील आणि ज्या सूचना ते मांडतील त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चितच विचार करतील असेही ते म्हणाले.

मी स्वत:चं कौतुक करत नाही, परंतु मी ६९ तालुके आणि विशेषता ९ जिल्हे फिरलो हे सर्व माध्यमांनी दाखवलं. जेव्हापासून मी पदभार स्वीकारला, तेव्हापासून मेळघाट ते मराठवाड्याच्या शेवच्या टोकापर्यंत, कोकणापासून ते उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत अशाप्रकारे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. सकाळी ७ वाजेपासून ते कधीकधी रात्र होते. परंतु शेतकऱ्यांशी मी चर्चा करतोय. शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये, त्यांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्यांनी नक्कीच रस्त्यावर उतरायला पाहिजे. रस्त्यावर उतरण्याचीच वेळ आली आहे. ज्यावेळी रस्त्यावर यायला पाहिजे होतं, शेतकरी, शेतमजूर, गरिबाला मदत करायला पाहिजे होती, ती मदत नाही केली म्हणून तर ही वेळ आली असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना म्हणाले.

त्यांच्याकडे जी काही ५५ आमदारांची फौज होती, त्यापैकी केवळ १५ आमदार राहिले आहेत ४० आमदार गेले आहेत. याचंही कुठंतरी चिंतन मंथन करायला पाहिजे. का गेले, कशामुळे गेले? आपण भविष्यात असं वागलो असतो. आता शाखांपर्यंत ते चालले पूर्वी मंत्र्याला, आमदाराला भेटायला वेळ नव्हता. परंतु आता ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे. त्यांनी रस्त्यावर उतरल्यावर थोडा घामा गाळावा, रक्त जाळावं आणि त्यांचा पक्ष मजबूत करावा असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *