Breaking News

शिंदे – फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना मराठा आरक्षणासह मंत्रिमंडळ विस्तारावरही होणार चर्चा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिली ४० दिवसांची मुदत ,सोबतच जरांगे पाटील पाटील यांनी पुन्हा उगारले उपोषणाचे हत्यार जागोजागी नेत्यांना करण्यात आलेली गावबंदी, आमदार अपात्रता सुनावणी तसेच मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत . या दोघांच्या या अकस्मात दौऱ्याने नानाविध तर्क लढवले जात आहेत

विजयादशमीनिमित्त आयोजित दसरा मेळावा पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून बोलावणे येताच ते तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्ली भेटीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे कळते. मराठा आरक्षण आणि आमदार अपात्रता इतर वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्तारावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यात नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे फडणवीस या दोन्ही नेत्यांचा १५ दिवसातला दुसरा दिल्ली दौरा आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराटह आरक्षणासाठी ४० दिवसांची मुदत दिली होती हि मुदत काल संपत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण आरक्षण देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दसरा मेळाव्यात दिली होती मात्र तरीही जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा आमरण उपोषणाचे हत्यार उपसल्याने राज्य सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे त्यातच मराठा समाजाने आरक्षणाची मागणी तीव्र करीत राजकीय नेत्यांना गावबंदी व त्यांच्या सभांमध्ये आंदोलने सुरु केल्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे .

रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनाआधी व्हावा,असा यासाठी आग्रह धरला होता.पुण्याचे पालकमंत्री पद मिळावे याकरीताही त्यांनी मागच्या वेळी आग्रह धरला होता त्यावेळी शिंदे फडणवीस दिल्लीत गेले होते. आता रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशना पुर्वी मुहूर्त लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढले आहेत. अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक ३० ऑक्टोबरपर्यंत देण्याचे आदेश दिले असून तुषार मेहता यांनी दसऱ्याच्या सुट्टीत विधानसभा अध्यक्षांसोबत सुधारीत वेळापत्रक तयार करावे असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आमदार अपात्रतेबाबत उद्या विधानसभा अध्यक्ष उद्या संध्याकाळी ४ वाजता सुनावणी घेणार आहेत. ३४ याचिका ६ गटात एकत्र केल्यावर सुनावणी पार पडणार आहे, तसेच मूळ याचिकांच्या मुद्द्यावरही सुनावणी घेतली जाणार आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *