Breaking News

शरद पवार म्हणाले, शेतकरी वर्गात सरकारविरोधात प्रचंड नाराजी

राज्यात विशेषतः शेतकरी वर्ग हा सत्ताधारी पक्षावर नाराज असून राज्यातील वातावरण हे महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक मध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

शरद पवार म्हणाले की, नाशिक, धुळे, सातारा, पुणे आदी कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी आहे. ऊस हे महाराष्ट्राचे प्रमुख पीक आहे. ऊस आणि इथेनॉल निर्मिती याबाबत केंद्र सरकारचे धोरण योग्य नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी देखील सरकारवर नाराज असल्याचे शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, याबरोबर अन्य पिकांच्या संदर्भातल्या किमती संदर्भात शेतकरी वर्ग नाराज असल्याचा दावा शरद पवार साहेब यांनी केला आहे. एकीकडे शेतकरी वर्ग नाराज आहे तर दुसरीकडे बेरोजगारी आणि महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील अस्वस्थ आहे. या सर्वाचा परिणाम होणार असून त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला मोजावी लागणार असे शरद पवार साहेब यांनी सांगितले आहे.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे एकंदरीत कामकाज हे विरोधी पक्षावर म्हणजेच आमच्यावर हल्ला करण्याचे त्यांचे धोरण आहे. ईडी, सीबीआय अशा तपास संस्थांचा वापर विरोधकांना अडकवण्यासाठी केला जात आहे. मात्र या कारवाई विरोधात जेव्हा विरोधक कोर्टात जातो, तेव्हा कोर्टाचा निकाल हा सरकारच्या विरोधात जात असल्याचा इशारा दिला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाया कशा पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत, याबाबतची सविस्तर माहिती प्रसार माध्यमांसमोर दिली. २०१४ नंतर १३१ लोकांची ईडीने चौकशी केली, त्यातील ११५ विरोधी पक्षातील होते. भाजपा सत्तेत आल्यानंतर १२१ नेत्यांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली. पण आधी वेगळ्या पक्षात असणाऱ्या लोकांवर ईडीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांची चौकशी थांबविण्यात आली. हसन मुश्रिफ, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांची व अन्य काही लोकांची चौकशी थांबवण्यात आली. पण जर का युपीएच्या काळात पाहिले तर, म्हणजेच२००४-१४ या काळात सर्वाधित काँग्रेसच्या ५ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. तर केवळ भाजपाच्या ३ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावरही केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप केला.

शरद पवार म्हणाले की, ईडी करून कारवाई झालेल्यामध्ये एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही. याउलट भाजपा मध्ये ज्या विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेश झाला. त्यांची चौकशी थांबवली आहे. त्यामुळे ईडीचा वापर हा केवळ विरोधी पक्षांसाठी केला गेला असल्याचे यातून दिसून येत असल्याचे सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *