Breaking News
ncp leader chhagan bhujbal on his birthday छगन भुजबळ

आणि भुजबळांनी सांगितले संपत्ती कशी आली आणि शिवसेना सोडल्यानंतरचा किस्सा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली?’ या लोकांच्या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर थेट उत्तर दिलं. आम्ही खूप कष्ट घेतले. आम्ही रोज भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली. अरे लहानपणापासून आम्ही मेहनत केली आहे, असं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं. ते गुरुवारी (१३ ऑक्टोबर) त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलत होते. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले, मी आणि माझा भाऊ आम्ही लहान होतो. त्यावेळी भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. तिथे जाऊन थोडी भाजी द्या हो म्हणत भाजीपाला गोळा करायचो आणि ती भाजी माजगावच्या घरासमोरील फुटपाथवर विकायचो. भाजी बाजार लांब असायचा. त्यावेळी टांगे असायचे. या टांग्यांना मागे धरायला जागा असायची. आम्ही गुपचूप जाऊन टांग्याच्या मागे लटकायचो. काही खोडसाळ लोक टांगेवाल्याला सांगायचे आणि टांगेवाला चाबूक मारायचा. तेव्हा आम्ही दोघेही कळवळायचो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली?’ या लोकांच्या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर थेट उत्तर दिलं. आम्ही खूप कष्ट घेतले. आम्ही रोज भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली. अरे लहानपणापासून आम्ही मेहनत केली आहे, असं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं.

छगन भुजबळ म्हणाले, मी आणि माझा भाऊ आम्ही लहान होतो. त्यावेळी भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. तिथे जाऊन थोडी भाजी द्या हो म्हणत भाजीपाला गोळा करायचो आणि ती भाजी माजगावच्या घरासमोरील फुटपाथवर विकायचो. भाजी बाजार लांब असायचा. त्यावेळी टांगे असायचे. या टांग्यांना मागे धरायला जागा असायची. आम्ही गुपचूप जाऊन टांग्याच्या मागे लटकायचो. काही खोडसाळ लोक टांगेवाल्याला सांगायचे आणि टांगेवाला चाबूक मारायचा. तेव्हा आम्ही दोघेही कळवळायचो.

छगन भुजबळ पुढे म्हणाले, मी प्राणलाल भोगिलाल यांच्या दास अँड कंपनीत मी मॅनेजर होतो. त्यावेळी हिंदुस्थानात सर्वाधिक व्हिंटेज कार त्यांच्याकडे होत्या. अण्णासाहेब माझे मित्र. मी माथाड्यांचे ठेकेही घेतले. त्यातही दोन पैसे मिळाले. अंजिरवाडीत रबरेक्स नावाची कंपनी बंद पडली होती. मालकच सोडून गेला होता. कोणालाच पगार नव्हता. कामगार म्हटले कंपनी घ्या, चालवा आणि हळूहळू आमचा पगार द्या. तेव्हा अख्ख्या बीएसटीचे टायर रिमोल्डिंगमध्ये माझ्याकडे यायचे.

असं असताना लोक विचारतात कसे आले पैसे कसे आले पैसे. मी पनवलेला आणखी एक कंपनी घेतली. मुंबई आणि गोवा पहिली लग्झरी बस भवानी ट्रॅव्हल्स नावाने छगन भुजबळने सुरू केली. सिनेमाही काढले. अनेक उद्योग सुरू होते, असंही त्यांनी सांगितले.

शिवसेना सोडल्यानंतरच्या आठवणी

छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या अब्रू नुकसान खटल्याचा एक किस्सा सांगितला. हा खटला का केला हे सांगताना सुभाष देसाई आणि संजय राऊतांच्या चिट्ठीनंतर जिंकत असलेला खटला न्यायाधीशांना हात जोडून विनंती करत मागे घेतल्याचंही सांगितलं.

छगन भुजबळ म्हणाले, रमाबाई नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. आंदोलन झालं, त्यावर गोळीबार झाला आणि ११ लहान-मोठी माणसं मारली गेली. मी विधानसभेत येऊन सांगितलं की, हे सरकार खुनी आहे. यांनी लोकांचे खून केले. दुसऱ्या दिवशी माझ्या घरावर हल्ला झाला. राजू जैन म्हणून एका व्यक्तीने तर मला छगन भुजबळ यांनी विटंबना कर म्हणून सांगितलं आणि मी नाही सांगितलं म्हणून त्यांनी दुसऱ्याकडून विटंबना करून घेतली, असं प्रतिज्ञापत्र दिलं.

सामनात छापून आलं, हाच तो नराधम, यानेच विटंबना केली. मी म्हटलं, मी काहीच केलं नाही. या प्रकरणात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गुंडेवार यांच्या आयोगाची नेमणूक झाली. त्यांनी मलाही बोलावलं. चौकशीत लक्षात आलं की प्रतिज्ञापत्र देणारा व्यक्ती जेव्हा माझ्याकडे आला असं सांगत होता, तेव्हा मी कांदिवलीत झोपड्या तोडू नये म्हणून मोर्चात होतो. त्याने ज्या हॉटेलमध्ये राहिल्याचं सांगितलं त्या हॉटेलमध्ये तो व्यक्ती राहिलाच नाही. ज्या बसने गेला सांगितलं ती बसच तिकडे नाही. यानंतर गुंडेवार आयोगाने मला क्लीन चिट दिली, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

मी बाळासाहेब ठाकरेंवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला. कारण एकीकडे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची क्लीन चिट, तर दुसरीकडे सामनाचं ‘हाच तो नराधम’ या मथळ्याखाली वृत्त. त्यात प्रश्नचिन्ह नव्हतं. खटला सुरू झाला. सांगण्यासारखं काहीच नव्हतं, आरोप आणि क्लीन चिट अशा सर्व गोष्टी सर्वांसमोर होत्या. काही महिन्यांनी सुभाष देसाई, संजय राऊत आले आणि एक चिट्ठी दिली.

मी त्यांना विचारलं काय काम आहे? ते म्हटले बाळासाहेबांचं वय झालं, आजारीही असतात. माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं थांबा, आता काहीच बोलू नका. काय करायचं हे मला कळलं. केस कधी आहे ते सांगा. त्यांनी तारीख सांगितली. मी त्या दिवशी न्यायालयात गेलो. मी न्यायाधीशांना विनंती केली की मला केस मागे घ्यायची आहे. पाच मिनिटे ते ऐकायलाच तयार नव्हते. ते म्हणाले केस पूर्ण झाली. केसचा काय निकाल आहे हे तुम्हाला कळतं का? तुम्ही काय करता असं मला म्हटले.
मी म्हटलं मी तुमचे अगदी पाय धरतो, मला केस मागे घ्यायची आहे. केस मागे घेतली. मग इतरांचं काय? सुभाष देसाई विश्वस्त आहेत. त्यांच्याविरोधातील केसही मागे घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे तेथेच पाठीमागे होते. त्यांनी सांगितलं बाळासाहेबांनी तुम्हाला चहाला बोलावलं आहे. मी सांगितलं नंतर येतो. आठ दिवसांनी बाळासाहेबांनी मला फोन केला आणि पूर्ण कुटुंबाला घेऊन मातोश्रीवर यायला सांगितलं.
यानंतर मी, समीर, पंकज, त्यांच्या मुली असे सगळे मातोश्रीवर गेलो. तीन-चार तास चर्चा, चहा, नाश्ता, जेवण झालं. जणुकाय आमच्या आयुष्यात काही घडलंच नाही. ते भांडण झालंच नाही, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *