Breaking News

सचिन सावंत यांच्या एक्सवरील तक्रारीवरून निवडणूक आयोगाने घेतली गंभीर दखल

महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत घटनात्मक पदावर असलेल्या प्रमुख व्यक्तींकडून मुख्यमंत्री अथवा मंत्र्यांकडून आयोजित सरकारी बैठकांना उपस्थित राहता येणार नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर आयोजित केलेल्या बैठकांना मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी उपस्थित रहात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी एक्स या सोशल मायक्रो ब्लॉगिंक साईटवरून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत अखेर त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचा खुलासा निवडणूक आयोगाचे मुख्याधिकारी एस चोकलिंग्मग यांनी आज सांगितले.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या दोन अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

यासंदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आपल्या एक्स या खात्यावरून तक्रार करताना म्हणाले की, वर्षा बंगल्यावर होणा-या राजकीय बैठकांच्या संदर्भात निवडणूक आयोगाचे सर्वप्रथम लक्ष वेधत. देशात आचारसंहिता लागू होऊन आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. तरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानावर सतत राजकीय बैठका होत आहेत. या बैठका तात्काळ थांबायला हव्या. हा आचारसंहितेचा खुलेआम भंग आहे. निवडणूक आयोगाने याची अजून दखल घेतलेली नाही हे दुर्देव आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी जागे आहे का? कारवाई करा अशी मागणी ही यावेळी केली.

राज्यात दुस-या टप्पात होणा-या मतदानाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत माध्यमांनी या संदर्भात प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना चोक्कलिंगम म्हणाले की, या तक्रारीप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून या नोटिशीला उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

आयोगाने नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे? या प्रश्नावर अधिक माहिती आपण मुंबई शहर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घ्या, असे सांगत चोक्कलिंगम यांनी अधिक माहिती देण्याचे टाळले.

मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीएस अमोल शिंदे व उपसचिव नितीन दळवी यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवल्याचे समजते.

विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या दालनात जनता दरबार भरवल्याची मध्यंतरी जिल्हा निवडणूक अधिका-यांकडे तक्रार करण्यात आली. अध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग झाला असून तातडीने करावाई करण्याची मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे या संदर्भात चोक्कलिंगम यांनी अद्याप तक्रार आली नसल्याचे सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *