Breaking News

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २०४ उमेदवार रिंगणात

 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात २९९ उमेदवारांचे अर्ज पात्र असून त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने २०४ उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्रालयातील पत्रकार कक्षात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णीसह मुख्य निवडणूक अधिकारी  मनोहर पारकरअवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

            लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेकनागपूरभंडारा-गोंदियागडचिरोली-चिमुरचंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये १९ एप्रिल तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणाअकोलाअमरावतीवर्धायवतमाळ-वाशिमहिंगोलीनांदेडपरभणी या आठ मतदारसंघामध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 4 एप्रिल होता. त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल केलेले उमेदवारनामनिर्देशन पत्र व पात्र उमेदवारांची संख्या याबाबतचा तपशील  खालीलप्रमाणे.

क्रमांक व मतदारसंघ

उमेदवार

नामनिर्देशन

पात्र उमेदवारांची संख्या

अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या

05- बुलढाणा

29

42

25

21

06 – अकोला

28

40

17

15

07- अमरावती

59

73

56

37

08- वर्धा

27

38

26

24

14- यवतमाळ – वाशिम

38

49

20

17

15 – हिंगोली

55

78

48

33

16 – नांदेड

74

92

66

23

17 – परभणी

42

65

41

34

एकूण

352

477

299

204

दुसऱ्या टप्प्यातील  या आठ लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीसाठी मतदारसंघनिहाय एकूण आठ जनरल निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक एकूण पाच आणि खर्च निरीक्षक एकूण ११ या प्रमाणे नियुक्त करण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील या आठ लोकसभा मतदारसंघातील मतदारांची यादी ४ एप्रिल रोजी अद्ययावत करण्यात आलेली असून माहिती खालीलप्रमाणे

अ.क्र.

मतदारसंघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकूण

मतदान केंद्रे

1

05- बुलढाणा

9,33,173

8,49,503

24

17,82,700

1,962

2

06 – अकोला

9,77,500

91,32,69

45

18,90,814

2,056

3

07- अमरावती

9,44,213

89,17,80

85

18,36,078

1,983

4

08- वर्धा

8,58,439

8,24,318

14

16,82,771

1,997

5

14- यवतमाळ – वाशिम

10,02,400

9,38,452

64

19,40,916

2,225

6

15 – हिंगोली

9,46,674

8,71,035

25

18,17,734

2,008

7

16 -नांदेड

9,55,084

8,96,617

142

18,51,843

2,068

8

17 -परभणी

11,03,891

10,19,132

33

21,23,056

2,290

          एकूण

77,21,374

53,99,057

432

1,49,25,912

16,589

दुसऱ्या टप्प्यातील ८ लोकसभा मतदारसंघामध्ये २३ जानेवारी २०२४ पासून  ४ एप्रिल २०२४ पर्यंत मतदार संख्येत झालेली वाढ खालीलप्रमाणे.

अ.क्र.

मतदारसंघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकूण

1

05- बुलढाणा

9015

9634

0

18649

2

06 – अकोला

6837

8345

5

15177

3

07- अमरावती

9734

11464

2

21200

4

08- वर्धा

7510

9342

2

16854

5

14- यवतमाळ – वाशिम

8509

12046

5

20560

6

15 – हिंगोली

6857

8283

2

15142

7

16 -नांदेड

11737

13434

7

25178

8

17 -परभणी

9453

10110

7

19570

          एकूण

69,652

82,658

20

1,52,330

वयोगटानुसार मतदार संख्या :

 

अ.क्र

मतदारसंघाचे नाव

18-19

20-29

30-39

40-49

50-59

60-69

70-79

80 +

1

05- बुलढाणा

26,456

3,58,287

4,17,453

3,74,282

2,79,626

1,78,329

95,559

52,708

2

06 – अकोला

29,202

3,78,171

4,28,893

3,97,314

3,09,685

1,94,905

1,03,421

49,223

3

07- अमरावती

17,387

3,24,021

4,15,054

3,89,500

3,25,684

1,97,303

1,08,159

58,970

4

08- वर्धा

25,154

2,92,544

3,58,141

3,72,703

2,92,529

1,84,486

1,02,577

54,637

5

14-यवतमाळ- वाशिम

28,167

3,92,554

4,38,361

4,11,484

3,22,862

1,95,166

10,28,82

49,440

6

15 – हिंगोली

28,628

3,97,508

4,29,814

3,78,496

2,73,277

1,67,326

89,223

53,462

7

16 -नांदेड

29,345

3,94,189

4,47,717

4,27,867

2,61,884

1,59,976

83,373

47,492

8

17 -परभणी

30,590

4,54,560

5,00,325

4,35,948

3,19,796

2,02,986

1,13,030

65,821

          एकूण

2,14,929

29,91,834

34,35,758

31,87,594

23,85,343

14,80,477

6,95,342

4,31,753

 

दुसऱ्या टप्प्यातील इटीपीबीएसद्वारे मतदान करण्यास पात्र मतदारांची माहिती :

अ.    क्र.

क्रमांक व मतदारसंघ

मतदारांची संख्या

1

05- बुलढाणा

4,395

2

06 – अकोला

3,843

3

07- अमरावती

2,689

4

08- वर्धा

1,521

5

14- यवतमाळ – वाशिम

1,545

6

15 – हिंगोली

1,348

7

16 -नांदेड

1,689

8

17 -परभणी

1,441

एकूण

18,471

      भारत निवडणूक आयोगाने ४० टक्के दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व ८५ वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छुक मतदारांना 12-डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघात ६ एप्रिलपर्यंत ८५ वर्ष वयावरील १० हजार ६७२ जेष्ठ नागरिकांचे तर ४० टक्के दिव्यांगत्व असलेले ३ हजार ५५५ दिव्यांग मतदारांचे त्याचप्रमाणे अत्यावशक सेवा या श्रेणीत ३८५ असे एकूण १४ हजार ६१२ अर्ज गृह मतदानासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा

तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील २ आणि पुणे विभागातील ७ व औेरंगाबाद विभागातील २ अशा एकूण ११ लोकसभा मतदारसंघामध्ये ७ मे २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  यामध्ये १२ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार असून १९ एपिल रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. नामनिर्देशन पत्र छाननी २० एप्रिल रोजी होईल तर २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.

तिसऱ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे :

तिसऱ्या टप्यातील ११ लोकसभा मतदारसंघातील ६ एप्रिल २०२४ पर्यंत अद्ययावत मतदारांच्या संख्येचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदारसंघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकूण

1

32-रायगड

8,19,454

8,46,664

4

16,66,122

2

35-बारामती

12,36,966

11,26,160

116

23,63,242

3

40-धाराशीव (उस्मानाबाद)

10,51,171

9,39,693

80

19,90,944

4

41-लातूर

10,33,648

9,39,896

61

19,73,605

5

42-सोलापुर

10,39,108

9,86,163

199

20,25,470

6

43-माढा

10,34,463

9,54,551

69

19,89,083

7

44-सांगली

9,51,364

9,13,115

112

18,64,591

8

45-सातारा

9,58,036

9,29,649

74

18,87,759

9

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

7,12,989

7,34,612

12

14,47,613

10

47-कोल्हापुर

9,82,573

9,49,344

90

19,32,007

11

48-हातकणंगले

9,24,404

8,86,738

95

18,11,237

एकूण

1,07,44,176

1,02,06,585

912

2,09,51,673

       

तिसऱ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघामध्ये २३ जानेवारीपासून ८ एप्रिल २०२४ पर्यंत मतदार संख्येत झालेली वाढ खालीलप्रमाणे आहे.  

अ.क्र.

मतदारसंघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकूण

1

32-रायगड

5,939

6,248

0

12,187

2

35-बारामती

24,329

22,942

3

47,274

3

40-धाराशीव(उस्मानाबाद)

7,985

8,492

2

16,479

4

41-लातूर

12,656

14,361

-2

27,015

5

42-सोलापुर

25,603

27,330

9

52,942

6

43-माढा

10,631

11,189

-6

21,814

7

44-सांगली

9,536

10,593

6

20,135

8

45-सातारा

9,469

10,117

7

19,593

9

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

4,502

4,639

1

9,142

10

47-कोल्हापुर

9,465

10,723

3

20,191

11

48-हातकणंगले

7,137

8,692

5

15,834

एकूण

1,27,252

1,35,326

28

2,62,606

 

            राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात ५ एप्रिल २०२४ पर्यंत राज्यातील वितरीत केलेले एकूण शस्र परवाने ७८ हजार ९९जमा करण्यात आलेली शस्रास्रे ३६ हजार ३४१जप्त करण्यात आलेली शस्रे १९५परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली  शस्रे ७२१परवाना जमा करण्यापासून सुट देण्यात आलेली शस्त्रे १४,७९२ तर राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी कायद्यांतर्गत ५२ हजार ६५७ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यता आली आहे.

शासकीय अंमलबजावणी यंत्रणांद्वारे राज्यभरात ३९८.२० कोटींची जप्ती

         राज्यामध्ये १ मार्च ते ५ एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसेदारुड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींची  जप्ती करण्यात आली. यामध्ये ३८ कोटींची रोख रक्कम, २४.२६ कोटींची ३० लाख २ हजार ७८१ लिटर दारु, २०७.४५ कोटींचे १० लाख ५३ हजार ५४५ ग्रॅम ड्रग्ज, ५५.१० कोटींचे २ लाख ७५ हजार ८३१ ग्रॅम मौल्यवान धातू, ४२ लाखांचे ४ हजार २७२ फ्रिबीज, ७२.८५ कोटींचे इतर साहित्य असे एकूण ३९८.२० कोटींची जप्ती करण्यात आली आहे.

 १६ मार्च  ते ७ एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यभरात सीव्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या १९०० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच या कालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील १४ हजार ६२३ तक्रारीपैकी १४ हजार ३३७ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

 

माध्यम देखरेख व संनियंत्रण समितीमार्फत २९ प्रमाणपत्रे

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या प्रि-सर्टीफिकेशनासाठी  नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने २९ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

उमेदवारांना डमी मतपत्रिका वापरण्याची मूभा

उमेदवाराने त्याचे नाव व चिन्ह मतपत्रिकेत कोणत्या जागी येईल ही माहिती असलेल्या डमी मतपत्रिका छापून घेतल्यासत्याला हरकत असणार नाही. मात्रअशा डमी मतपत्रिकेवर अन्य उमेदवारांची नावे किंवा चिन्हे असता कामा नयेत. अशी डमी मतपत्रिकाखऱ्या मतपत्रिकेचा रंग तसेच आकार याच्याशी मिळती-जुळती असता कामा नये. तसेचमतदारांच्या माहितीकरिता उमेदवार किंवा राजकीय पक्ष डमी बॅलेट युनिट तयार करु शकतातअसे डमी बॅलेट युनिट लाकूडप्लास्टिक किंवा प्लाय बोर्ड बॉक्सचे असू शकतात. याबाबत सविस्तर तरतुदी उमेदवारांच्या हस्तपुस्तिकेत नमूद करण्यात आलेल्या आहेतअसेही श्री.चोक्कलिंगम यांनी यावेळी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *