Breaking News

खा इम्तियाज जलील यांची मागणी, त्या प्रकरणाची सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा त्या घटनेला राजकिय वळण देण्याचे काम सत्ताधारी वर्गाकडून होतेय

नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात झालेल्या राड्यामुळे जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्याचे पाह्यला मिळाले. त्यानंतर यावरून सत्ताधारी आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे चित्र निर्माण झाले. यापार्श्वभूमीवर आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधारी गटावर जोरदार हल्लाबोल केला करत या प्रकरणाची सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून चौकशी करण्याची मागणी केली.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचं काम राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केले आहे. भाजपा आणि शिवसेनेने याला वेगळे वळण लावले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणीही केली.

यावेळी पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, संभाजीनगर प्रकरणाची प्रामणिकपणे चौकशी करणे गरजेचे आहे. कारण या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचं कामही सत्ताधारीवर्गाकडून केले जात आहे. निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असली तरी वैयक्तिकरित्या या प्रकरणात कोणालाही टार्गेट करत नाही असंही यावेळी स्पष्ट केले.

तसेच औरंगाबादमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेवरूनही सत्ताधारी आणि मविआवर टीका करताना इम्तियाज जलील म्हणाले, मविआच्या सभेला परवानगी देण्यात आली असली तरी भाजपा- शिवसेनेच्या यात्रेला परवानगी का दिली जाते आहे असा सवाल करत भाजपा आणि शिवसेनेकडून घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा गंभीर आरोपही केला.

त्याचबरोबर इम्तियाज जलील यांनी भाजपा आणि शिंदे गटाच्या मंत्र्यावर निशाणा साधता म्हणाले की, राडा झाल्यानंतर भाजपाचे आणि शिवसेनेचे मंत्री क्रिमिनल गँगस्टरसारखे मंत्री शहरामध्ये वागत आहेत असा गंभीर आरोपही केला.

Check Also

टोलप्रश्नी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र आषाढी वारीनिमित्त टोल वसुली पुढे ढकला

महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *