Breaking News

Tag Archives: shivsena (Shinde Group)

विजय वडेट्टीवार यांची टीका, महायुतीच्या घटकपक्षांची स्थिती गुलामासारखी..

महविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच दुसरी बैठक होणार आहे. त्यात उर्वरित जागांच्या विषयावर विस्तृत चर्चा होणार आहे. पुढील बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला अंतिम होईल, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते …

Read More »

काँग्रेस सोबतचे जवळपास दोन पिढ्यांचे संबध मिलिंद देवरा यांनी तोडले एकनाथ शिंदे यांच्या गटात केला प्रवेश

एकेकाळी काँग्रेसच्या वैभवाच्या काळात स्व. मुरली देवरा आणि स्व.गुरुदास कामत यांनी स्वतःचे व्यक्तीमत्व उत्तुंग नेत पक्षाच्या वैभवातही भर घालण्याचा आणि मुंबईतील काँग्रेसच्या ताकदीत भर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे धाडस ना कधी मुरली देवरा यांनी केले ना कधी गुरुदास कामत यांनी त्यांच्या उभ्या ह्ययातीत केले नाही. मात्र …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मराठा-ओबीसी समाजात दरी निर्माण करण्याच्या पापाचे…

भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सरकारही हुकूमशाही पद्धतीनेच काम करत आहे. भाजपाप्रणित सरकारने राज्यात मराठा-ओबीसी समाजात वाद उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराला संपवण्याचा हा प्रकार आहे. दोन्ही समाजात संघर्ष निर्माण करण्यात सरकारचे योगदान असून मराठा-ओबीसी समाजात दरी निर्माण करण्यातील पापाचे वाटेकरी भाजपा सरकारच आहे, असा हल्लाबोल …

Read More »

उद्धव ठाकरे म्हणाले…पेन्शन योजना लागू केल्यानंतर हार-तुरे स्विकारणार

काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठीच्या निवडणूकीत जूनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र त्याच आता वर्षाहून अधिक काळ लोटला तरी जूनी पेन्शन संदर्भात अद्याप कोणताही निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला नाही. या प्रश्नी सरकारी कर्मचाऱ्यांनी सध्या नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार, बार फुसका… मुंब्रा दौऱ्यावरून लगावला टोला

मुंब्रा येथील शिवसेना शाखेच्या इमारतीवर शिंदे गटाने बुलडोझर चालविल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्याचा दौरा केला. परंतु शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्या जागेजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी करत उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना जागेची पाहणी करू दिली. तसेच तणावही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला होता. त्यानंतर झालेल्या छोटेखानी जाहिर सभेत …

Read More »

शिंदे गटाचा सवाल, प्रस्थापित शिक्षण सम्राटांनी मराठा मुलांना आरक्षण का दिले नाही? उद्धव ठाकरेंनी कामगार सेना विकली, मुंबईतले उद्योग बंद करण्यास मालकांना मदत केली

कुठे काय चांगले होत असेल तर उबाठा पक्ष आणि त्यांच्या सहकारी पक्षातील लोकांच्या पोटात दुखू लागते. सुरत डायमंड हब गुजरातमध्ये तयार झाल्यावर आरडाओरडा करणारे, ज्यावेळेस सुरत डायमंड हबच्या कामाला २०१५ मध्ये सुरुवात झाली तेव्हा हे झोपले होते का? त्यावेळेस हे का बोलले नाहीत. हे डायमंड पोर्ट गुजरातला का गेला, याची …

Read More »

ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, तर शिंदे गटाचा ? दसरा मेळाव्या आडून पुनर्मिलनाची शक्यता

परंपरागत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आला आहे. मात्र गतवर्षी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी वेगळी चूल मांडली. त्यानंतर मागील वर्षी आणि यंदाच्यावर्षीही उद्धव ठाकरे यांच्याकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली असतानाही पुन्हा …

Read More »

राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा उद्धव यांचा प्रयत्न…… हिंदूहृदयसम्राटाचा मुलगाच हांजी हाजी करतोय ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी!- शिवसेना खा. राहुल शेवाळे आणि आ. उदय सामंत यांची टीका

देशभरातील सर्व भ्रष्ट नेते मुंबईत पर्यटनासाठी आले आहेत. एकेकाळी वंदनीय बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या नेत्यांची सरबराई करण्यासाठी हिंदुहृदयसम्राटांचा मुलगाच हांजी हांजी करत फिरत आहे. त्यामुळे या दुभंगलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांचा चेहरा जनतेसमोर आला आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार व मंत्री उदय …

Read More »

‘आम्हीच शिवसेना’ शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराचे ६५०० हजार पानाचे जबाब शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांना सादर

राज्यातील शिवसेनेच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्या संदर्भातील अंतिम निकाल देण्याचे सर्वाधिकार राज्य विधिमंडळाच्या अध्यक्षांना दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत आणि सोयीनुसार विधानसभा अध्यक्षांनी फक्त शिंदे गटाच्या ४० आमदारांच्या दाव्यावर निर्णय घेणे अपेक्षित असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या ५६ …

Read More »

शिंदे गटाचा घरचा आहेर, कांद्यामुळे दिल्लीतील सरकार गेलं तर सरकारही हलतं त्यामुळे… शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी करून दिली काँग्रेस सरकारच्या काळातील गोष्टीची आठवण

काही वर्षापूर्वी दिल्लीतील राज्य सरकार आणि काँग्रेसचे सरकार कांद्याच्या वाढत्या किंमतीवरून सत्तेतून पाय उतार व्हावं लागले. तर कोरोना काळापासून देशासह राज्यातील जनतेला सातत्याने महागाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर तसेच कांद्याच्या प्रश्नावर देशातील जनता आणि शेतकरी यांचा रोष किती मोठा असतो याचे ढळढळीत उदाहरणच शिंदे गटाच्या आमदाराने मोदी सरकार …

Read More »