Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार, बार फुसका… मुंब्रा दौऱ्यावरून लगावला टोला

मुंब्रा येथील शिवसेना शाखेच्या इमारतीवर शिंदे गटाने बुलडोझर चालविल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्याचा दौरा केला. परंतु शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्या जागेजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी करत उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना जागेची पाहणी करू दिली. तसेच तणावही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला होता. त्यानंतर झालेल्या छोटेखानी जाहिर सभेत उद्धव ठाकरे यांनी हिम्मत असेल तर पोलिसांना बाजूला सारून या असे आव्हान देत तुमचं डबड उचलून न्या, नाही तर आम्ही काढून फेकून देऊ असा इशारा दिला.

उद्धव ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आनंद दिघे यांचे ते ठाणे आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा आवाज इतका मोठा आहे की त्यामुळे त्यांना युटर्न घ्यावा लागला. काल दिवाळी सुरू झाली. तिथे फुसका बार आला. पण तो काही वाचलाच नाही असा पलटवारही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

शिवसेना शिंदे गटाच्यावतीने ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हजर होते. कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, प्रवक्ते नरेश मस्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सत्तेत असलेल्यांना माज आलाय तुम्ही आमचे पोस्टर फाडले उद्या निवडणूकीत तुमचा माज फाडू असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ग्रामपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच झाल्या. त्यात माज करणाऱ्यांना ७ व्या नंबरवर पाठविले. त्यांचा १० वा ही नंबर लागू शकतो असा खोचक टोला लगावत जनतेसमोर कोणाचे काही चालत नाही. या सर्व लोकांचा माज जनता येत्या निवडणूकीत उतरवेल. आमचे सरकार आल्यानंतर सर्व सणांवर असलेले निर्बंध काढून मोठ्या उत्साहात साजरे करण्यास सुरुवात केली. आता सर्व हिंदूचे सण असेच उत्साहात साजरे होत राहतील असेही सांगितले.

 

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

शरद पवार यांनी घेतला पटेल यांचा समाचार, मलाही उत्सुकता आहे पण ते ईडीचे…

कर्जत येथील अजित पवार गटाच्या मंथन शिबीरात बोलताना शरद पवार यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *