Breaking News

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सुतोवाच; जनतेला अपेक्षित निर्णय देणार… सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही विधानसभाध्यक्षांची सूचक विधान

राज्यातील शिवसेनेतील फुटीनंतर दाखल झालेल्या अपात्र आमदार याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जवळपास दोनवेळा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारत त्यांच्या कामाच्या जबाबदारीची आठवण करून दिली. परंतु विधानसभाध्यक्ष तथा कुलाब्याचे आमदार असलेल्या राहुल नार्वेकर यांनी जनतेला अपेक्षित असलेला निर्णय देणार असल्याचे सांगत शेवटी लोकशाहीत बहुमताला महत्व असल्याचे सांगत अपात्र आमदार याचिकेप्रकरणी निकाल काय असेल याचा सुतोवाच केला.

दिवाळीनिमित्त कुलाबा येथे आयोजित दिवाळी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे आले असता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना वरील वक्तव्य केले. दरम्यान, लोकशाहीत बहुमताला जरी महत्व असलं तरी राज्यघटनेतील तरतूदीनुसार ते वैधानिक की अवैधानिक आहे ठरविण्याचा निर्णय न्यायपीठाला असतो. तसेच भाजपा या राजकिय पक्षाच्या नावातच जनता असल्याने या नेमके कोणत्या जनतेला अपेक्षित असलेला निर्णय देणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.

राहुल नार्वेकर पुढे बोलताना म्हणाले, काळजी करू नका राजकिय फटाके सातत्याने फुटत असले तरी मोठे फटाके फुटण्याला आणखी वेळ आहे. त्यामुळे सध्या राजकिय फटाक्यांपेक्षा दिवाळीच्या फटाक्यांवर बोलू असे सांगत मुख्य प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतरही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अपात्र आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ३१ डिसेंबरच्या अंतिम मुदतीबाबत सवाल उपस्थित केला असता राहुल नार्वेकर म्हणाले, राजकिय फटाके फुटण्यास थोडा वेळ बाकी आहे. त्यामुळे काळजी करू नका. जनसामान्यांना अपेक्षित असा निर्णय होणं गरजेचे आहे. लोकशाहीत निर्णय होत असताना ते कायद्याच्या चौकटीत व्हायला पाहिजे.

तसेच पुढे बोलताना राहुल नार्वेकर भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, असे निर्णय शास्वत ठरायला हवेत आणि निर्णय टीकून कसे राहतील याचा विचार करणं अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या काळात असा शास्वत निर्णय घेऊ, त्या विधिमंडळाची साथ मिळेल असा विश्वास व्यक्त करत कायद्यातील तरतूदी आणि नियमांचे पालन केलं जाईल असे आश्वासनही दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *