Breaking News

Tag Archives: rahul narvekar

उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, आमदार आणि संरक्षक म्हणून जबाबदारी… विधिमंडळाच्या शतकोत्तरी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत

शिवाजी महाराजांच्या या महान भूमीने शतकानुशतके आपल्या मातृभूमीच्या प्रगतीचे नेतृत्व केले आहे, उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मराठा स्वराज्याची तत्त्वे, त्याच्या प्रशासकीय चौकटीत विकेंद्रित राजनैतिकता, योग्यता, कायद्याचे राज्य, आर्थिक विकास आणि लोककल्याण यांचा समावेश करून, जगभरातील सार्वजनिक सेवा वितरणात अधिक कार्यक्षमता, जबाबदारी आणि उत्तरदायित्व …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत दक्षता घ्या वांद्र वर्सोवा कोस्टल रोडप्रकरणी आयोजित बैठकीत दिले निर्देश

वांद्रे – वर्सोवा कोस्टल रोडच्या कामामध्ये एक कनेक्टर गजधर बांध, सांताक्रूझ पश्चिम या ठिकाणी येणार आहे. हा कनेक्टर जेथे उतरणार आहे तेथील पुलाच्या खालील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना नागरिकांना समस्या जाणवणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे वांद्रे क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात …

Read More »

दक्षिण मुंबईतील प्रलंबित नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर कार्यान्वीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या प्रयत्नाला यश

गोकुळदास तेजपाल अखेर जीटी रुग्णालय, मुंबई येथे सन २०१२ साली मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अखेर १२ वर्षानंतर म्हणजे एक तपाच्या प्रतीक्षेनंतर कार्यान्वीत होत आहे. विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा मतदार संघाचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करुन, आपल्या दालनात सर्व संबंधित अधिकारी यांचे समवेत वारंवार बैठका निमंत्रित करुन, …

Read More »

नाना पटोले यांच्या जय भिम नगरबाबतच्या प्रश्नी विधानसभाध्यंक्षांचे आदेश जयभीम नगरमधील ६५० बेघर कुटुंबांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा

पवई भागातील जय भीम नगरमधील झोपड्या तोडल्याचा प्रश्न उपस्थित करुन नाना पटोले म्हणाले की, जयभीम नगरमधील ६५० गरिब, मागासवर्गिय कुटुंबांवर ६ जूनच्या रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई करून या कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे, आज ही सर्व कुटुंबं रस्त्यावर आहेत. पोलीस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून चुकीची कारवाई करून या मागासवर्गीय …

Read More »

मोठी बातमीः मराठा आरक्षणाचे विधेयक आधी आवाजी तर नंतर एकमताने मंजूर

मागील काही वर्षापासून चिघळलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज पुन्हा नवे विधेयक सादर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेले मराठा समाजाला शैक्षणिक आणि शासकिय-निमशासकिय नोकरीत आरक्षण देणारे विधेयक अखेर आधी सत्ताधारी बाकावरील आमदारांच्या आवाजी मतदानाने तर नंतर विरोधकांनी पाठींबा असल्याचे जाहिर केल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर …

Read More »

पंतप्रधान म्हणाले, देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकारी…

देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवले आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तर देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी असून भारतीय लोकशाही जगासाठी मार्गदर्शक आहे असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गौरवोद्गार काढले. विधानसभेत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे …

Read More »

राहुल नार्वेकर यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, त्यांच्या कागपत्रांमध्ये तो मुद्दाच नाही

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाची महापत्रकार परिषदेत राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निकाल दिलेला नसल्याचा आरोप करत खोचक शब्दात टीका केली. त्यानंतर काही वेळातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि तीन क्रायटेरियानुसारच निर्णय घेतल्याचे सांगत अनिल परब …

Read More »

राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात ठाकरे आणि शिंदे गटाची न्यायालयात धाव

राज्यातील बहुचर्चित शिवसेनेतील आणि सत्ताकारणातील महत्वाच्या घटनांचा भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिकेतील मागणीप्रमाणे १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर शिवसेना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या …

Read More »

नाना पटोले यांची टीका, नार्वेकरांचा निकाल दिल्लीतील गुजरात लॉबीने दिलेला ड्राफ्ट

शिवसेना पक्षातील आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातील काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष असते, पण आजचा निकाल पाहता तो निकाल निष्पक्ष वाटत नाही. संविधानाची पायमल्ली करत घटनेतील १० व्या शेड्युलला डावलल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनाही यावेळी डावलल्याचे स्पष्ट …

Read More »

शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, विधानसभाध्यक्ष जर मुख्यमंत्र्यांच्या घरी जात…

मागील दिड वर्षापासून ठाकरे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असताना त्यावर विधानसभाध्यक्षांनी वेळकाढू पणा केल्याचे दिसून येत आहे. तसेच लोकशाहीच्या प्रथेनुसार विधानसभा अध्यक्ष हे कधीही मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या घरी जात नाहीत. एखादे काम असेल किंवा काही आदेश द्यायचे असतील तर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण …

Read More »