Breaking News

मोठी बातमीः मराठा आरक्षणाचे विधेयक आधी आवाजी तर नंतर एकमताने मंजूर

मागील काही वर्षापासून चिघळलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज पुन्हा नवे विधेयक सादर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेले मराठा समाजाला शैक्षणिक आणि शासकिय-निमशासकिय नोकरीत आरक्षण देणारे विधेयक अखेर आधी सत्ताधारी बाकावरील आमदारांच्या आवाजी मतदानाने तर नंतर विरोधकांनी पाठींबा असल्याचे जाहिर केल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक आवाजी एकमताने मंजूर केल्याचे यावेळी जाहिर केले.

मराठा आऱक्षणाचे पुरस्कर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम देत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा तसेच सगेसोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ द्या या प्रमुख मागणीवरून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. भाजपाचे गटनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटानेही विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावित सादर केलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीचे आऱक्षण देणारे विधेयक सादर केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधेयकावर आवाजी मतदानाने होय चे बहुमत आणि नाही चे बहुमत जाणून घेण्यासाठी सदस्यांकडे मत विचारले. मात्र त्यावर सत्ताधारी बाकावरील बहुतांष सदस्यांनी होय असे सांगत मराठा आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा दर्शविला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधेयक बहुमताने पारित अशी घोषणा सुरु करायला सुरुवात केली. परंतु अजित पवार गटाचे मंत्री तसेच राज्यातील ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधेयकावर सविस्तर भूमिका मांडण्यासाठी काही बोलायचे असे सांगत भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या दोन्ही आमदारांना बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

परंतु विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांना अर्थात छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांना बोलण्याची संधी दिली. त्यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला वेगळं आऱक्षण देण्यास आमचाही विरोध नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या विधेयकाला आमचा पाठिंबा पण आहे.. पण किमान आम्हाला बोलू तरी द्या अशी मागणी केली. याचवेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारने मांडलेल्या विधेयकाला आमचा पाठिंबा आहे. परंतु आमचे म्हणणे काय आहे हे तरी ऐकून घ्या असे सांगत काँग्रेसचाही पाठिंबाही असल्याचे सांगितले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा समाजाला आऱक्षण देणारे नवे विधेयक एकमताने आवाजी मतदानात मंजूर केल्याची घोषणा केली.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही विधेयकाचे आता झाले, आता विधेयकाबरोबरच राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेचे काय असा प्रश्न उपस्थित केले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने काढलेल्या आरक्षणाच्या विधेयकाला सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रित पाठिंबा दिल्याने हे विधेयक एकमताने आवाजी मतदानात मंजूर केल्याची घोषणा केली. तसेच राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्या अधिसूचनेवर मागविलेल्या हरकती व सूचना ६ लाख आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रत्येक हरकती व अधिसूचनेवर नीट विचार आणि कायदेशीर अभ्यास करून मार्ग काढणार असल्याचे स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *