Breaking News

ईव्हीएम मशिन्स बनविणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळावरच भाजपाचे पदाधिकारी नियुक्त

मागील काही दिवसांपासून चंदिगढ येथील महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपा विचाराच्या निवडणूक अधिकाऱ्याने स्वतःच मतपत्रिकेवर खानाखुणा करत अल्पमतात असलेल्या भाजपाच्या उमेदवारास महापौर पदी निवडूण आणले. विशेष म्हणजे या विषयीचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी दखल घेत नव्याने मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या घडामोडीत आता ईव्हीएम मशिन्स तयार करणाऱ्या भेल कंपनीच्या संचालक मंडळावरील ७ सदस्यांची नियुक्ती केंद्र सरकारने जाहिर केली. परंतु या सात पैकी चार सदस्य हे भाजपा पक्षाच्या विविध कार्यकारणीवर पदाधिकाऱी राहिले असल्याची माहिती आरटीआयमधून उघडकीस आली आहे.
लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत तसतशा देशभरातील विविध राजकिय पक्षातील भ्रष्ट्राचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भाजपा समाजात प्रवेश देण्याचा सपाटा भाजपाच्या शिर्ष नेतृत्वाकडून घेण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला विविध राज्यातील प्रशासकिय यंत्रणांचा वापर करत जिथे पराभव होत असेल त्या ठिकाणी निकाल फिरविण्याचे प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत असल्याचा प्रकार चंदिगढ महापौर निवडणूकीच्या निमित्ताने पुढे आला. आता ईव्हीएम मशिन्स तयार करणाऱ्या भेल अर्थात भारत इलेक्ट्रीक लिमिटेड या कंपनीवर स्वतंत्रपणे नियुक्त करण्यात आलेल्या संचालकांची माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्ये अजय बोस यांनी मागितली.
त्यावर भेलने १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अजय बोस यांच्या माहिती अधिकार अर्जावर माहिती देताना १) डॉ पोडाला वेंकटा पार्थसारथी, २) खचारिया मनसुखभाई शमजीभाई, ३) संतोषकुमार एन ४) प्रफुलकुमार चौधरी, ५) डॉ शिवनाथ यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून या पाचही व्यक्तींचा कार्यकाळ २९ डिसेंबर २०२१  ते २८ डिसेंबर २०२४ पर्यंत राहणार आहे. तर ६) गोकुलन वंगाकॅडी, याचा कालावधी २१ जानेवारी २०२२ ते २० जानेवारी २०२५ असून ७) संचालक श्यामा सिंग यांचा कालावधी ८ फेब्रुवारी २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राहणार आहे.
तर अजय बोस यांनी यातील सात संचालकांमधील चार संचालकांची माहिती देताना सांगितले की, डॉ पाडोला वेंकटा पार्थसारथी भाजपाच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीस आणि आंध्र प्रदेशच्या उपाध्यक्षा आहेत. २) तर खचारिया मनसुखभाई शमजीभाई गुजरातच्या राजकोटच्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. ३) शिवनाथ यादव हे उत्तर प्रदेशच्या प्रदेश भाजपाचे माजी उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. ४) श्यामा सिंग हे बिहारचे माजी उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.
https://x.com/AjayBos93388306/status/1759798532536713339?s=20
या चार संचालकांच्या निवडीवरून अजय बोस म्हणाले की, ईव्हीएम मशिन्स बनविणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळावर ७ पैकी जर ४ संचालक हे जर सत्ताधारी पक्षाशी संबधित असलेले असताना ईव्हीएम मशिन्समध्ये वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर कशाच्या आधारे निर्धोक राहिल असा संशय व्यक्त करत केंद्रीय निवडणूक आयोगाने हे संचालक मंडळ बरखास्त करून नव्या संचालक मंडळाची नियुक्ती करावी अशी मागणीही केली.

Check Also

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *