Breaking News

राहुल नार्वेकर यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, त्यांच्या कागपत्रांमध्ये तो मुद्दाच नाही

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाची महापत्रकार परिषदेत राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निकाल दिलेला नसल्याचा आरोप करत खोचक शब्दात टीका केली. त्यानंतर काही वेळातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि तीन क्रायटेरियानुसारच निर्णय घेतल्याचे सांगत अनिल परब यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये फक्त पक्षांतर्गत झालेल्या निवडणूकांचे निकाल आहेत. त्यामध्ये पक्षाच्या घटनेतील बदला संदर्भातील एक ओळही नमूद करण्यात आलेली नाही असे सांगत विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलेल्या निर्णय योग्य असल्याचे ठामपणे सांगितले.

यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या शिवसेनेच्या पक्षघटनेला मी मानतो. मात्र उद्धव ठाकरे गटाने सादर केलेल्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाला पाठवून मान्यता घेण्यात आलेली नाही. तसेच एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पक्षघटनेला आयोगाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे त्या पक्ष घटनेतील तरतूदीनुसार एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या गटाला वाटले म्हणून दुसऱ्याला पक्षातील पदावरून काढून टाकला येत नाही. तसेच त्यासाठी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची समंती असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

पुढे बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, ठाकरे गटाने सादर केलेल्या पक्ष घटनेच्या पक्षांतर्गत निवडणूकीची फक्त कागदपत्रे निवडणूक आयोगाला सादर केली. मात्र त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये पक्ष घटनेला मान्यतेसाठी सदर घटना सादर केल्याचा कुठलाही उल्लेख त्यांच्या पत्रांमध्ये नाही. त्यामुळे शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाशा आधारेच निर्णय घेतला असल्याचेही सांगितले.

यावेळी बोलताना राहुल नार्वेकर यांच्यावर लबाड अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केल्याची टीका केल्याबाबत विचारले असता नार्वेकर म्हणाले, आपण योग्य कामं केल नाही म्हणून त्याचं खापर इतरांवर करणं, वैयक्तीक स्वरूपाची टीका करणं या तसेच दुसऱ्यांवर दोषारोप करणे आदी गोष्टी करण्यात येतात. त्यामुळे ठाकरे गटाने केलेली टीका ही त्याच दृष्टीने असल्याचा पलटवार केला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *