Breaking News

मनोज जरांगे पाटील जालन्यात येताच म्हणाले, २४ तारखेच्या लढ्यासाठी तयार रहा

मराठा-कुणबी समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देणार असल्याच्या मुद्यावरून ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली. तसेच राज्य सरकारवर आणि मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही टीका करण्यास सुरुवात केली. तसेच राज्यभरात ओबीसी समाजाच्या संघटनेकडूनही राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका करण्यात येत आहे.

त्यातच आज दिवाळीच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांना छ्त्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांचे जालना जिल्ह्यात मोठे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मराठा समुदायाने मनोज जरांगे पाटील यांच्यावर जेसीबी मशिन्सच्या माध्यमातून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने २४ तारखेच्या अंतिम लढ्याची तयारी करावी आणि त्यासाठी तयार रहावे असे आवाहन करत १ डिसेंबरपासून साखळी उपोषणाची तयार रहावे असेही सांगितले.

तसेच पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला जरा रूग्णालयातून डिस्चार्स मिळालेला असला तरी मी घराचा उंबरठा ओलंडणार नाही. मराठा समाजाच्या लेकरांसाठी मी लढतोय. मग घरात जाऊन दिवाळी कशी साजरी करू असा सवाल उपस्थित करत पुढील आठवड्यापासून अर्धवट राहिलेल्या भागाचा दौरा पूर्ण करणार असल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या जालना जिल्ह्यापासूनच ओबीसी नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ मात्र मनोज जरांगे यांना आव्हान देण्यासाठी मोर्चा काढला.

त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझे उपोषणाच्या आंतरावली सराटी या गावापासून ६०-७० किलोमीटर लांब ओबीसी नेत्यांचा मोर्चा आहे. तो ओबीसी समाजाचा नाही. त्यामुळे नेत्यांनी काढलेला मोर्चा मला आव्हान कसा ठरु शकतो. ओबीसी समाज तर इमानदार आहे. तो गरिब असल्याने तो मोर्चा ओबीसी समाजाचा नसल्याचेही स्पष्ट केले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *