Breaking News

मुहुर्त ट्रेडिंग शेअर बाजार ३५० हून अधिक तर निफ्टी १०० अंशावर

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांकडून आपल्या शेअर खरेदी विक्रीचा प्रारंभ दिवाळीच्या मुहुर्तावर सुरु करतात. वास्तविक पाहता दिवाळीला शेअर बाजारातील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद असतात. मात्र तरीही मुहुर्त पाहून खरेदीदार दिवाळीच्या दिवशी मुहुर्त पाहून खरेदीला प्रारंभ करतात. आज शेअर बाजारात बॉम्बे स्टॉक एक्सेंजचच्या दरात ३५० हून अधिक अर्थात ४०० च्या अंकावर पोहोचला तर निफ्टीचा दर १०० अंशावर पोहचून बंद झाला.

सकाळी मुहुर्तावर शेअर बाजारात खरेदीला सुरुवात झाली. तेव्हा शेअरचा दर ३५५ वर अर्थात ६५ हजार २५९.४५ वर निर्देशांकावर पोहोचला. तर निफ्टी १०० वर अर्थात १९ हजार ५२५.५५ वर बंद झाला.

दरवर्षीपेक्षा या वर्षी शेअर बाजाराचा निर्देशांक सर्वाधिक होता. आज मुहुर्त ट्रेडिंग असल्याने शेअरच्या दरात ५ टक्क्याने वाढ होत दर २१२७ रूपयांवर पोहोचला होता. तर निफ्टीच्या दरात १ टक्क्यान वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुहुर्त ट्रेडिंगचा फायदा काही कंपन्यांना झाला. यात कोल इंडियाच्या शेअर्सना चांगलीच मागणी आली. त्यामुळे संध्याकाळ अखेर कोल इंडिया शेअरचा भाव ३३१.८५ वर पोहोचला. तसेच कोल इंडियाच्या तिमाहीचा ताळेबंद नुकताच जाहिर झाला असून त्याचा फायदाही या कंपनीच्या शेअर्सना झाला. विशेष म्हणजे मुहुर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने कोल इंडियाला मिळालेला हा दर सात वर्षात मिळालेला उच्चांकी दर असल्याचे बोलले जात आहे.

दिवाळीनिमित्त मुहुर्त ट्रेडिंगसाठी सेबीकडून मुहुर्तावेळी एक तासासाठी शेअर्स खरेदीची मुभा दिली जाते. अनेक गुंतवणूकदारांकडून संध्याकाळी ६.१५ ची वेळ निवडली गेली होती. तसेच भारतीय आर्थिक वर्ष सवंत २०८० सुरु होत असल्याचा मुहुर्त साधत १ तासासाठी शेअर बाजार खुला कऱण्यात आला होता. मुहुर्त सुरु झाला तेव्हा शेअर बाजाराचा निर्देशांक ६०० वर पोहोचला तर निफ्टी १९ हजार ५८० वर पोहोचला.

आज झालेल्या मुहुर्त ट्रेडिंगसाठी गुंतवणूकदारांनी कार्पोरेट इंडिया, हेल्थ सेक्टर, देशांतर्गत बँका आदी क्षेत्रात गुंतवणूकीवर भर दिला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *