Breaking News

ठाण्यातील दिवाळी पहाट बाळासाहेबांनाच काय….सुषमा अंधारे यांचे टीकास्त्र ऐन दिवाळीच्या दिवशीच मुख्यमंत्री झाले दिवाळी पहाट कार्यक्रमावरून टीकेचे धनी

दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुंब्रा दौऱ्यावरून टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. त्यानंतर मात्र दिवाळी पहाटच्या कार्यक्रमावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विट करत चांगलेच टीकास्त्र सोडले.

ठाणे शहरात तलाव पाळी येथे शिंदे गटाकडून दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी प्रसिध्द लावणी डान्सर गौतमी पाटील हिचा भल्या सकाळी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला स्वतः शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आणि नेत्यांनी हजेरी लावली होती.

आतापर्यंत दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने शास्त्रीय गायक-वादकांचे आणि भक्तीगीतांचे कार्यक्रम मुंबई-पुणेसह राज्यात आयोजित केले जातात. तसेच अशा कार्यक्रमास रसिक-कानसेन प्रेक्षकही आवर्जून हजेरी लावतात. परंतु दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा कार्यक्रम शिंदे गटाने आयोजित केला म्हणून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पं.बिस्मिला खाँ साहेबांची सनई, पं. भीमसेन जोशी यांचे भक्ती गीत किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळ ऐकत होतो.

पुढे सुषमा अंधारे ट्विट करत म्हणाल्या, ठाण्यामध्ये आज उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेबांनाच काय अवध्या महाराष्ट्राला सुध्दा अपेक्षित नसेल असे टीकास्त्र सोडले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

शरद पवार यांनी घेतला पटेल यांचा समाचार, मलाही उत्सुकता आहे पण ते ईडीचे…

कर्जत येथील अजित पवार गटाच्या मंथन शिबीरात बोलताना शरद पवार यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *