राज्यात मागील काही दिवसापासून उघडीप दिली होती. मात्र आता कालपासून पावसाने पुन्हा एकदा आपला हजेरी दाखविण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच त्यामुळे मुंबई, पालघरसह कोकण आणि राज्याच्या काही भागात आज पासून पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार आणि अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
काल आणि आज असे दोन दिवस पालघर, रत्नागिरी, रायगड, नंदूरबार, पुणे, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसाठी आज आणि उद्या आणि औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर, येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, सिंधूदुर्ग, जळगांव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
25 Aug,1.30 pm: #Mumbai #Thane in past 6hrs light to mod rains.Same trend likly to cont ovr city for nxt 3,4hrs.#North_Maharashtra #Palghar &#south_Konkan & #ghat_areas to be watched for intermittent intense spells
Depression ovr nw MP,adj E Rajasthan abt 60km w-sw of Guna (W MP) pic.twitter.com/TwjRA2gt93— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 25, 2024
यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सलग दोन दिवस किंवा तीन दिवस यलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. त्यामुळे या भागांमध्ये सतत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस सातत्याने स्थानिक नागरिकांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/qGoox8kZo4
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 25, 2024
या सततच्या पावसामुळे अनेक पाणलोट क्षेत्र तथा धरणं भरून जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या कालावधीत काही भागातील धरणांचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना यापूर्वीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
25 Aug, पुढील 4,5 दिवसांत खाली दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. कोकणात व घाट भागात काही ठिकाणी रेड अलर्ट पण आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेचीही शक्यता.
28 ऑगस्टपासून गंभीर हवामानाची तीव्रता कमी होण्याची शक्यता.
IMD pic.twitter.com/hIj5NVednw— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 25, 2024
पावसाचा जोर आणि हवामानाची तीव्रता २८ ऑगस्टपासून कमी होण्याची शक्यता ही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.